राज्यातील साडेतीन लाख घरे ‘सौभाग्य’मुळे उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 10:33 PM2017-09-29T22:33:46+5:302017-09-29T22:39:10+5:30

कोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही,

Lakhs of three lakh houses in the state will be blessed with 'good fortune' | राज्यातील साडेतीन लाख घरे ‘सौभाग्य’मुळे उजळणार

राज्यातील साडेतीन लाख घरे ‘सौभाग्य’मुळे उजळणार

Next
ठळक मुद्देघर तिथे वीजजोडणी : देशाच्या तुलनेत राज्याचा वेग अधिकदोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी

विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही, अशा कुटुंबात मोफत वीज देण्याची घोषणा पंतप्रधानांनी सोमवारी (दि. २५) केली असून, त्यानुसार महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांत या ‘सौभाग्य’ योजनेतून वीजपुरवठा करण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे. ‘महावितरण’ने मार्च २०१५ पासून तब्बल १६ लाख कुटुंबांच्या घरांत उजेड पेरण्याचे काम केले आहे.

देशात अजूनही वीज पोहोचली नाही अशी तब्बल चार कोटी कुटुंबे आहेत. त्यांना मार्च २०१९ पर्यंत वीज देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च करणार आहे. सन २०११ च्या सामाजिक व आणि आर्थिक जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत कनेक्शन देण्याची ही ‘सौभाग्य’ योजना आहे. पंतप्रधानांनी योजना जाहीर केल्यावर महाराष्ट्रात अंधारात संसार करणारी किती कुटुंबे आहेत, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला.

मार्च २०१५ पर्यंत अशी वीज नसलेली राज्यातील ३० जिल्ह्यांत तब्बल १९ लाख ३६ हजार ६९० कुटुंबे होती. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनावर घेऊन ‘घर तिथे वीज’ देण्याचा कार्यक्रम अत्यंत कार्यक्षमतेने राबविला. त्यातून दोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी झाले आहे. ज्या अत्यंत दुर्गम भागात वीज नेण्यासाठी अडचणीच आहेत, तिथे महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणेच्या (महाऊर्जा) माध्यमातून अपारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर करून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यत: गडचिरोली, नंदूरबार अणि चंद्रपूर जिल्ह्यांत अशी १११ गावे असून, तिथे ३० कोटी खर्चून डिसेंबर २०१७ पर्यंत वीजजोडणी देण्याचे नियोजन आहे.


वीजपुरवठा नसलेल्या कुटुंबांची जिल्ह्यांतील संख्या
सातारा- १०४८३ सांगली- ५१९१, सिंधुदुर्ग- ४०६५ ठाणे- २२०१३, नाशिक- २१९५८ नंदूरबार ३३६५६, जळगाव- २९३२८ पुणे- २७१३,
नांदेड- २२५५८ गडचिरोली- २२४७०,
बीड- २२०४४.

वीजपुरवठ्यात अडचणी काय...
नव्याने वाड्या-वसाहती झालेला भाग
अत्यंत दुर्गम भागांत वीजजोडणी देण्यात अडचणी
अभयारण्य असलेल्या जिल्ह्यांत वनविभागाच्या परवानगीसाठी अडचणी
आर्थिक स्थिती गरिबीची असल्याने वीजजोडणीसाठी मागणीच नाही.
 

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने’तून १२ लाख कुटुंबांत वीजपुरवठा करता येईल अशा पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात झाली आहे. वीज पुरवठ्याचे राज्यात ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे.
- किशोर शेगोकार, अधीक्षक अभियंता
ग्रामीण विद्युतीकरण विभाग

Web Title: Lakhs of three lakh houses in the state will be blessed with 'good fortune'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.