नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यासाठी ‘लाल निशाण’तर्फे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:27 AM2021-05-25T04:27:44+5:302021-05-25T04:27:44+5:30
कोल्हापूर : कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या विरोधात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना महामारी रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, ...
कोल्हापूर : कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या विरोधात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना महामारी रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोमवारी लाल निशाण पक्षाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी उपोषण केले.
केंद्रातील मोदी सरकारने स्वत:चे व भांडवलदारांचे हित जोपासण्याकडे लक्ष दिल्यानेच आज देशात कोरोनाची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लस संशोधनात केंद्राचे कोणतेही योगदान नाही. लस खरेदी करण्याकडे दुर्लक्ष केल्याने आज मृत्यूचे तांडव सुरू आहे. कोरोना संकटाच्या आडून शेतकरी, कामगार विरोधी कायदे करून आपला उद्देश सफल करायचा एवढेच काम केंद्र सरकारने केले आहे. हे सरकार देशातील गोरगरीब जनतेचे भले करू शकत नाही. यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी लाल निशाण पक्षातर्फे सोमवारी उपोषण करण्यात आले. पक्षाच्या लक्ष्मीपुरी येथील कार्यालयात अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, अनंत कुलकर्णी, शांताराम पाटील, बी. के. कांबळे, धोंडिबा कुंभार, दिलीप लोखंडे, प्रकाश जाधव, तुकाराम तळप, शामराव पाटील, पद्मिनी पिळणकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : कोरोना महामारी रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोमवारी लाल निशाण पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयात उपोषण केले. यावेळी अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, शांताराम पाटील, सुवर्णा तळेकर आदी उपस्थित होते. (फोटो-२४०५२०२१-कोल-लाल निशाण)