मोदींच्या राजीनाम्यासाठी लाल निशाण पक्षाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:57+5:302021-05-26T04:24:57+5:30
कोल्हापूर: जनतेला संकटातून बाहेर काढण्याची नीतीमत्ता केंद्र सरकारकडे राहिलेली नसल्यानेच प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा ...
कोल्हापूर: जनतेला संकटातून बाहेर काढण्याची नीतीमत्ता केंद्र सरकारकडे राहिलेली नसल्यानेच प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी लाल निशाण पक्षाने राज्यभर एकदिवसीय उपोषण केले. कोल्हापुरात सर्व श्रमिक संघाचे अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, अनंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.
लाल निशाण पक्षातर्फे काढण्यात आलेल्या निवेदनात कोरोना साथीत मोदी सरकारची सर्व धोरणे फसलेली आहेत. त्यांच्यामुळे मृत्यूचे तांडव सुरू असून, जिवंत असणाऱ्यांचेही जगणे अवघड बनले आहे. शिवाय कोराेनाच्या आडून कामगार, शेतकरी यांच्या विरोधात धोरणे राबवली जात आहेत, नवे कायदे पुढे आणले जात आहेत. शिक्षण धोरणात बदल केले जात आहे. हे सर्व सुरू असताना दिल्लीत हजारो कोटी रुपये खर्चून सेंट्रल व्हीस्टाचे बांधकाम जोरात सुरू आहे. ही सर्व परिस्थिती पाहता मोदींना या पदावर राहण्याची नैतिकता राहिलेली नाही, असे म्हटले आहे.
या आंदोलनात शांताराम पाटील, सुधाकर सावंत, प्रतिभा कांबळे, बी.के.कांबळे, धोेंडिबा कुंभार, दिलीप लोखंडे, प्रकाश जाधव, प्रकाश कांबरे, तुकाराम तळप, श्यामराव पाटील, पद्मिनी पिळणकर यांनी सहभाग घेतला.