Navratri -पाचव्या माळेला ललितापंचमीला अंबाबाई अंबारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 05:54 PM2019-10-03T17:54:42+5:302019-10-03T17:55:51+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (गुरुवारी) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रुसलेल्या त्र्यंबोलीदेवीची समजूत काढण्यासाठी अंबाबाई हत्तीवर बसून आपल्या लवाजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते, असा या पूजेचा मथितार्थ आहे.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (गुरुवारी) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रुसलेल्या त्र्यंबोलीदेवीची समजूत काढण्यासाठी अंबाबाई हत्तीवर बसून आपल्या लवाजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते, असा या पूजेचा मथितार्थ आहे.
श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातील वेगळा दिवस म्हणजे ‘ललितापंचमी’ असते. या दिवशी देवीचा श्रृंगार दुपारी बाराच्या आधीच होतो. देवी आपली प्रिय सखी त्र्यंबोलीच्या भेटीला जाते. कामाक्ष राक्षसाचा वध करून करवीरच्या पूर्वेला अंबाबाईकडे पाठ करून रुसून बसलेल्या त्र्यंबोलीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई जाते.
कोल्हासुर वधाचे प्रतीक म्हणून तिच्या दारात कोहळ्याचा भेद केला जातो. अंबाबाईने दिलेल्या वचनानुसार सर्व देवदेवता, ऋषी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जातात. ही पूजा रामप्रसाद ठाणेकर, श्रीनिवास जोशी, प्रसाद काटकर यांनी बांधली. त्यांना रवी माईणकर यांचे सहकार्य लाभले.