‘सावित्रीबाई फुले’मध्ये लवकरच लॅमिनर एअर फ्लो मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:04 AM2020-01-07T11:04:47+5:302020-01-07T11:09:10+5:30
गुडघे, सांधे रोपणासाठी अत्यावश्यक असणारी लॅमिनर एअर फ्लो मशिन लवकरच सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. तसेच ४ डी सोनोग्राफी स्कॅन मशिनही आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दोन्ही मशिनसाठी २५ लाखांची आवश्यकता असून एक सामाजिक संस्थेने निधी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मशिनरी हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतर गौरगरीब रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया आणि अल्प दरात सोनोग्राफीची सोय होणार आहे.
कोल्हापूर :गुडघे, सांधे रोपणासाठी अत्यावश्यक असणारी लॅमिनर एअर फ्लो मशिन लवकरच सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. तसेच ४ डी सोनोग्राफी स्कॅन मशिनही आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दोन्ही मशिनसाठी २५ लाखांची आवश्यकता असून एक सामाजिक संस्थेने निधी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मशिनरी हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतर गौरगरीब रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया आणि अल्प दरात सोनोग्राफीची सोय होणार आहे.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल गौरगरीब रुग्णांसाठी आरोग्यवाहिनी आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मध्यंतरी हॉस्पिटलची दुरावस्था झाली होती. गेल्या दोन-चार वर्षापासून हॉस्पिटलला गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने येथील कामे सामाजिक संस्था, दानशुर व्यक्तींच्या मदतीने केली जात आहे. महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजना सुरु झाली आहे. तसेच काही साधानसामु्रगीही नव्याने आणली जात आहेत. अतिदक्षता विभागही सुरु केला आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
लॅमिनर एअर फ्लो मशिनची असणे का गरजेचे
आयुष्यमान योजनेतून जिल्ह्यात प्रथमच टोटल हिप रिपलेसमेंट ही शस्त्रक्रिया सावित्रीबाई फुले हॉस्पीटलमध्ये मोफत झाली. मात्र, गुडगे आणि साधे रोपणासाठी लॅमिनर एअर फ्लो मशिन बंधनकारक आहे. या मशिनमुळे हडासंदर्भातील अॅपरेशनवेळी थेअटरमध्ये हवा प्रदूषीत होण्यास अटकाव बसतो. त्यामुळे रुग्णाला इन्फेकशन होत नाही. हे मशिन नसल्यामुळे अशा प्रकारची अॅपरेशन करता येत नाही. मशिन बसविल्यास गौरगरीब रुग्णांना मोफत आॅपरेशन करणे शक्य होणार आहे.
लॅमिनर एअर फ्लो मशिनचे फायदे
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीशी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे साावित्रबाई फुले हॉस्पिटलमध्ये डिजीटल एक्सरे मशिन आणण्यात यश आले. लॅमिनर एअर फ्लो मशिन आणि ४ डी सोनोग्राफी स्कॅन मशिन आणण्याचे ध्येय आहे. त्यासाठी एक सामाजिक संस्थेशी पाठपुरावा केला असून ते २५ लाखांचा निधी देण्यासाठी सकारात्मक आहे.
अवधूत भाट्ये,
नेशन फर्स्ट फौंडेशन