रात्रीच्या सुरक्षेसाठी रेडियम रिफ्लेक्टर बनले दीपस्तंभ

By admin | Published: December 25, 2014 11:22 PM2014-12-25T23:22:11+5:302014-12-26T00:04:36+5:30

दिनकर चौगुले यांचा उपक्रम : तब्बल १५०० लोकांना मिळाला लाभ

The lamp pillar became radium reflector for night safety | रात्रीच्या सुरक्षेसाठी रेडियम रिफ्लेक्टर बनले दीपस्तंभ

रात्रीच्या सुरक्षेसाठी रेडियम रिफ्लेक्टर बनले दीपस्तंभ

Next

सरदास चौगुले - पोर्ले तर्फ ठाणे --रामप्रहरी किंवा तिन्ही सांजेच्यावेळी आरोग्यासाठी फिरायला जाणारे तसेच रात्री-अपरात्री मेंढपाळांसाठी वाट तुडवित जाणाऱ्या धनगरांना वाहनाच्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी रिफ्लेक्टर (रेडियम) लावलेल्या १५०० काठ्यांचे मोफत वाटप पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी केले.
उत्साही जीवनाचा संकल्प म्हणून मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या मंडळींना नजरेसमोरची वाहने दिसतात; पण मागून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी अपघाताची शक्यता अधिकच
असते आणि वास्तवात घडतही
आहे. रिफ्लेक्टर लावलेली
काठी चालणाऱ्याच्या हातात असली म्हणजे वाहनचालक सावध
होतो आणि अपघातासारखा धोका टळू शकतो, असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून दिनकररावांनी १५०० लोकांना रिफ्लेक्टर चिकटवलेल्या काठ्यांचे वाटप केल्या. त्यांनी पोर्ले तर्फ ठाणे परिसरातील पंचगंगा पुलावर, वाशी नाका, फुलेवाडी नाका या ठिकाणी मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांना काठ्या वाटप केल्या आहेत.
तसेच रात्री-अपरात्री मेंढपाळांसाठी वाट तुडवित जाणाऱ्या मेंढपाळांच्या हातात असणाऱ्या कुऱ्हाडीच्या दांड्याला रिफ्लेक्टर चिकटवले आहे. तसेच दालमिया (आसुर्ले पोर्ले) साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या १४० बैलगाड्यांना रिफ्लेक्टरच्या पट्ट्या चिकटवल्या आहेत.
निसर्गमित्र दिनकर चौगुले यांच्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत
होत आहे.

असेही बक्षिस
पंचगंगा पुलावरती रिफ्लेक्टर चिकटवलेल्या काठ्यांचे वाटप करताना दिनकररावांना एक ज्येष्ठ गृहस्थाने ५०० रुपयांची नोट खिशात घातली आणि त्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदनही केले.


शाहूपुरी येथील रिक्षा हाऊसमध्ये रिफ्लेक्टरच्या पट्टीच्या खरेदीसाठी गेलो होतो. तेव्हा त्या दुकानातील मालकांनी या एवढ्या पट्ट्यांचे काय करणार असे विचारल्यावर मी माझ्या उपक्रमाची माहिती दिली. तेव्हा त्यांनी ३००० रुपयांचे रिफ्लेक्टर फुकट दिले. त्यांच्या या प्रेरणेने मी हा उपक्रम उत्साहाने राबवला आणि त्याचे कौतुकही झाले. त्यामुळे मदतीला हात देणारी माणसे विरळच असतात.
- दिनकर चौगुले, निसर्गमित्र

Web Title: The lamp pillar became radium reflector for night safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.