महिलेच्या गळ्यातील ६० हजाराचे दागिने हिसडा मारुन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 07:06 PM2021-06-22T19:06:39+5:302021-06-22T19:08:46+5:30

Crimenews Kolhapur : पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत नेत असल्याचा बहाणा करुन दोघा युवकांनी निर्जन रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र व लक्ष्मीहार असा सुमारे ६० हजाराचा ऐवज हिसडा मारुन चोरुन नेल्याची घटना घडली. येथील कृषी विद्यापीठातील मुलींचे होस्टेल ते सरनोबतवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. याप्रकरणी सुनिता जनार्दन कांबळे (वय ५० रा. नवीन होस्टेलनजीक, कृषी विद्यापीठ, सरनोबतवाडी) यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

Lampas with 60,000 ornaments around the woman's neck | महिलेच्या गळ्यातील ६० हजाराचे दागिने हिसडा मारुन लंपास

महिलेच्या गळ्यातील ६० हजाराचे दागिने हिसडा मारुन लंपास

Next
ठळक मुद्देमहिलेच्या गळ्यातील ६० हजाराचे दागिने हिसडा मारुन लंपास दोघा दुचाकीस्वारांचे कृत्य : कृषी विद्यापीठनजीक घटना

कोल्हापूर : पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत नेत असल्याचा बहाणा करुन दोघा युवकांनी निर्जन रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र व लक्ष्मीहार असा सुमारे ६० हजाराचा ऐवज हिसडा मारुन चोरुन नेल्याची घटना घडली. येथील कृषी विद्यापीठातील मुलींचे होस्टेल ते सरनोबतवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. याप्रकरणी सुनिता जनार्दन कांबळे (वय ५० रा. नवीन होस्टेलनजीक, कृषी विद्यापीठ, सरनोबतवाडी) यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुनिता कांबळे ह्या कृषी विद्यापीठातील मुलीच्या होस्टेवर सफाई कामगार म्हणून काम करतात. सोमवारी सायंकाळी त्या होस्टेलमधील काम अटोपते घेऊन मधल्या रस्त्यावरुन सरनोबतवाडीकडे पायी घरी जात होत्या, त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून दोघे युवक लाल रंगाची दुचाकी पेट्रोल संपल्याचा बहाणा करुन ढकलत पुढे येत होते.

त्या कच्च्या मार्गावर खणीजवळ आल्यानंतर त्या दोघां युवकांनी कांबळे यांच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र व सोन्याचा लक्ष्मीहार हिसडा मारुन तोडून घेतले. कांबळे यांनी त्वरीत गळ्यावर हात ठेवल्याने अर्धा लक्ष्मीहार त्यांच्या हातात राहीला. चोरट्यांनी हाती लागलेला अर्धा सोन्याचा लक्ष्मीहार व मणी मंगळसुत्र घेऊन पलायन केले. घटनेनंतर कांबळे यांनी आरडा-ओरडा केला, पण तोपर्यत चोरट्यांनी दुचाकी सुरु करुन धूम ठोकली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पर्यवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक साहील झिरकार, पो.नि. सिताराम डुबल, उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पहाणी केली.

दरम्यान, सुनिता कांबळे यांनी सोमवारी रात्री उशीरा राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. त्यामध्ये सुमारे २० हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळे वजनाचे मणी मंगळसुत्र व ४० हजार रुपये किंमतीचे एक तोळे सोन्याच्या लक्ष्मीहारचा अर्धा भाग अज्ञाताने चोरल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

 

Web Title: Lampas with 60,000 ornaments around the woman's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.