साखर, तांदळाच्या अमिषाने महिलेचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 07:15 PM2021-02-01T19:15:32+5:302021-02-01T19:17:17+5:30
Crime News Kolhapur- मोफत तांदूळ, साखर देण्याचे अमिष दाखवून सुमारे ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन महिलेचे लुबाडणूक करण्याची घटना घडली. याप्रकरणी संजीवनी यशवंत लोंढे (वय ५० रा. अंबाबाई मंदीरजीक, कंदलगाव, ता. करवीर) असे फसलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी अनोळखी ४० वर्षीय महिलेवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कोल्हापूर : मोफत तांदूळ, साखर देण्याचे अमिष दाखवून सुमारे ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन महिलेचे लुबाडणूक करण्याची घटना घडली. याप्रकरणी संजीवनी यशवंत लोंढे (वय ५० रा. अंबाबाई मंदीरजीक, कंदलगाव, ता. करवीर) असे फसलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी अनोळखी ४० वर्षीय महिलेवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजीवनी लोंढे यांची एका महिलेशी स्टेशन रोडवर भेट झाली. त्यावेळी त्या अनोळखी महिलेने लोंढे यांचा विश्वास संपादन करून त्यांना मोफत तांदूळ व साखर देण्याचे अमिष दाखवले. त्या महिलेने लोंढे यांना रिक्षातून घेऊन प्रथम नागाळा पार्क येथील एका दुकानात नेले. ते दुकान बंद असल्याने त्यांना पुन्हा गंगावेशमधील एका दुकानात नेले. तेथे त्यांनी लोंढे यांना तुमच्या अंगावर सोन्याचे दागिने असल्याने ते तुम्हाला श्रीमंत समजतील तेथे फक्त गरिबांना साखर व तांदूळ दिले जाते, असे सांगितले.
तसेच तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, कानातील बुगड्या काढून माझ्याकडे द्या, असे सांगून ते सर्व दागिने काढून घेतले. त्यानंतर तांदूळ व साखर आणून देतो, असे सांगून लोंढे यांना गंगावेश चौकात थांबविले व तेथून त्या ठकसेन महिलेने दागिन्यांसह पलायन केले. याबाबत फसवणूक झाल्याची तक्रार संजीवनी लोंढे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली.