जमीन गैरव्यवहारात वकिलास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:35 AM2017-08-05T00:35:44+5:302017-08-05T00:36:49+5:30

कºहाड : ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करणाºया वकिलास शुक्रवारी कºहाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तब्बल पाच वर्षानंतर वकिलास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

Land abducted by lawyers | जमीन गैरव्यवहारात वकिलास अटक

जमीन गैरव्यवहारात वकिलास अटक

Next
ठळक मुद्दे पाच वर्षांपूर्वी फिर्याद; ओगले ग्लासच्या जमिनीत घोटाळ्याचा आरोप; बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप७ रोजी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती.

कºहाड : ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करणाºया वकिलास शुक्रवारी कºहाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तब्बल पाच वर्षानंतर वकिलास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

अ‍ॅड. विजय भगवान पाटील (रा. मंगळवार पेठ, कºहाड) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात औंध संस्थानच्या प्रमुख गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्यासह अनेकांचे जबाब यापूर्वीच घेण्यात आले आहेत. या जबाबातून संबंधित जमिनीत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. तपासात तांत्रिक बाबी समोर आल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी थेट अ‍ॅड. विजय पाटील यांनाच अटक केली. हजारमाचीचे पोलिस पाटील व ओगले काच कारखान्याचे संचालक मुकुंद नामदेव कदम यांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी फिर्याद दिली होती.

पोलिसाच्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील ओगले काच कारखान्याला औंध संस्थानने ९९ वर्षांच्या कराराने १९२३ साली चौदा एकर १९ गुंठे जमीन नाममात्र भाडेतत्त्वाने दिली होती. ओगले काच कारखान्याच्या विसर्जनानंतर त्या जमिनीबाबत काही व्यवहार झाले. ते व्यवहार बनावट असल्याची फिर्याद मुकुंद नामदेव कदम यांनी न्यायालयात ७ जुलै २०१२ रोजी दाखल केली. न्यायालयाने त्याच्या सखोल पोलिस तपासाचे आदेश दिले. ओगले काच कारखान्याची सिटी सर्व्हे नं. ४४, ४८, ४९, ५०, ५१ याचे व्यवहार झाले आहेत. ते व्यवहार भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन अधिकारी विक्रम सोनवणे यांच्याशी संगनमत करून झाले असल्याचा आरोप आहे.

सोनवणे यांनी याप्रकरणी त्याचवेळी अटकपूर्व जामिन घेतला आहे.
अ‍ॅड. विजय पाटील यांनी केलेल्या व्यवहारामध्ये ओगले काच कारखान्याची या जागेवरची नोंद बनावट कागदपत्राद्वारे रद्द केली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याप्रकरणात आमणे नावाच्या व्यक्तीची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. ती बाबही पोलिस तपासात समोर आली आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची बनावट सही व नाव या व्यवहारासाठी वापरण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार या प्रकरणात गायत्रीदेवी यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

कोणत्याही प्रकारची सही अथवा खरेदीपत्राला परवानगी दिली नसल्याचे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे गायत्रीदेवी यांचीही फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले. पोलिसांकडून गत पाच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.
दरम्यान अ‍ॅड. पाटील यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज केला. मात्र, तोही नामंजूर झाला. या प्रकरणात आणखी तांत्रिक माहिती आल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी अ‍ॅड. विजय पाटील यांना अटक केली.

तीन दिवसांची पोलिस कोठडी
अ‍ॅड. विजय पाटील यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्या. एस. एम. पाडोळीकर यांनी त्यांना दि. ७ रोजी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अ‍ॅड. विजय पाटील यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक, विश्वासघात केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Web Title: Land abducted by lawyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.