फेरसुनावणीत अडकले चौपदरीकरणाचे भूसंपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:50 AM2019-06-12T00:50:43+5:302019-06-12T00:51:12+5:30
सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिसा, सुनावण्या,
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिसा, सुनावण्या, फेरसुनावण्या याच गर्तेत प्रशासकीय यंत्रणा अडकल्याने वर्षअखेरपर्यंतही हे भूसंपादन पूर्ण होण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.
नागपूर, सोलापूर, कोल्हापूर ते रत्नागिरी असा हा नवा राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर, मिरज, सांगोला ते सोलापूर अशा सुमारे ३७० किलोमीटर मार्गासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षांत कोकणाशी दळणवळण वाढल्याने या नव्या मार्गाची गरज भासू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील हातकणंगले, करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी या चार तालुक्यांतील सुमारे ४९ गावांतून हा मार्ग जातो.या संपूर्ण मार्गाचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरण होणार आहे. मार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्णातील भूसंपादन प्रक्रियेसाठी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी अधिसूचना काढली.त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली; पण प्रारंभीच मार्गावरील मोजणी, क्षेत्र निश्चितीला विलंब झाला. राष्टÑीमहामार्गाची आखणी पूर्ण झाली असताना भूसंपादनासाठी काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पुढील प्रक्रिया ही कासवगतीने सुरू आहे. खरे तर मार्च २०१८ मध्ये हे भूसंपादन सुरू होणे आवश्यक होते; पण त्यानंतर फक्त प्रक्रिया सुरू असून अद्याप इंचभरही भूसंपादन झालेले नाही. शासनाकडून प्रक्रियेस विलंब होऊ लागल्याने पुढील भूसंपादनाची प्रक्रियाही हळूहळ ू रखडू लागली आहे. सुमारे दीड वर्ष झाले तरीही अद्याप इंचभरही भूसंपादन करण्यात यश मिळालेले नाही. विशेषत: करवीर तालुक्यातील सर्व गावांनी या नव्या मार्गासाठी विरोध दर्शविला आहे.
कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाºया मार्गावरील गावांचा समावेश
आंबा, वासल, गोळसवडे, जाधववाडी, चांदोली, तोफेश्वर, हणबरवाडी, भैरेवाडी, भाडळे, मलकापूर, शाहूवाडी, करंजोशी, ठमकेवाडी, गोगवे, बांबवडे, डोणोली, खुटाळवाडी, आवळी, नावली, बोरपाडळे, भांबरवाडी, पैजारवाडी, केर्ले, रजपूतवाडी, कुशिरे, निगवे, भुयेवाडी, भुये, शिये, नंदगाव, हालोंडी, हेर्ले, चोकाक.
प्रत्यक्षात क्षेत्र वाढले
प्रारंभी भूसंपादनाच्या नोटिसीवेळी क्षेत्र निश्चित करण्यात आले होते; पण प्रत्यक्ष मोजणीनंतर क्षेत्र आणखी वाढल्याचे निदर्शनास आले; त्यामुळे पुन्हा शेतकºयांना नोटिसा काढल्या व पुन्हा सुनावण्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.
नवीन बायपास मार्ग
केर्ले (शहीद जवान मच्छिंद्र देसाई पेट्रोल पंपानजीक)पासून नवा बायपास महामार्ग आखला असून तो रजपूतवाडी, कुशिरे, निगवे, भुयेवाडी, भुये, शिये, नंदगाव, हालोंडी, हेर्ले, चोकाक असा पुढे कोल्हापूर ते सांगली मार्गाला मिळणार आहे.
शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगलेतील सुमारे ५१२ शेतकºयांना भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत भारतीय राज प्राधिकरणामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्या सुनावण्या पूर्ण झाल्या असून, काहींच्या फेरसुनावण्या सुरू आहेत.
कोल्हापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असली तरीही सध्या तक्रारदार शेतकºयांच्या फेरसुनावण्या सुरू आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूधारक शेतकºयांना शासनामार्फत मोबदला दिल्यानंतर भूसंपादन करण्यात येणार आहे.
- बी. एस. साळुंखे, प्रकल्प संचालक, भारतीय राजमार्ग प्राधिकरण