बनावट कागदपत्रे करून जमिन हडप, डीवायएसपी जाधवरसह चौघावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 03:17 PM2020-07-16T15:17:11+5:302020-07-16T15:21:54+5:30
बनावट कागदपत्रे तयार करून जमिन हडप केल्याप्रकरणी तसेच जमिनीत येण्यास मज्जाव करून धमकी दिल्या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्या गडहिंग्लज येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत असणारे अंगद जाधवर, सध्या अटक असलेला आरोपी गणेश फाटक यांच्यासह अन्य तिघावर चंदगड पोलिसात नोंद झाला आहे.
तेऊरवाडी : सडेगूडवळे ता.चंदगड येथील जमिन बनावट कागदपत्रे तयार करून हडप केल्याप्रकरणी तसेच जमिनीत येण्यास मज्जाव करून धमकी दिल्या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्या गडहिंग्लज येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत असणारे अंगद जाधवर, सध्या अटक असलेला आरोपी गणेश फाटक यांच्यासह अन्य तिघावर चंदगड पोलिसात नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद लक्ष्मण भोजू तांबाळकर रा. हंबिरे पो. नांदवडे ता. चंदगड या शेतकऱ्यांने चंदगड पोलिसांत दिली आहे.
गडहिंग्लज विभागाचे पोलिस उपअधिक्षक अंगध जाधवर, गणेश महादेव फाटक ( हिंडगाव ), श्रीशैल तम्मन्ना नागराळ ( तिलारी नगर), मारूती धोंडिबा गुरव ( कानुर बु. ) , मारूती तातोबा कांबळे ( कानूर बु . ) यानी सन २००९ते एप्रिल २०२० पर्यंत फिर्यादी लक्ष्मण तांबाळकर याबरोबरच धोंडीबा गावडे व संतोष गावडे यांच्यासह इतर सह हिस्सेदार दत्तात्रय गावडे, शंकर गावडे , शिवाजी गावडे , तानाजी गावडे, सुर्यकांत गावडे , तुळसा गावडे , सुभद्रा गावडे , कृष्ण झेंडे , श्रीमती रुक्मीणी गावडे , कृष्णा गावडे , नामदेव गावडे , भिमा गावडे राहणार सडेगुडवळे ता. चंदगड याची जमिन खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केली तसेच फिर्यादी याना या जमिनित येणेस प्रतिबंध करून शिवीगाळ करुन दहशत निर्माण केली.
या बरोबरच गोळी घालण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे . यानुसार चंदगड पोलिसात पोलिस उपअधिक्षक अंगद जाधवर यांच्यासह इतर चार आरोपी वर भा . द .वि.स. कलम ४२० , ४६४ , ४६८ , ४७१ , ४४७ , ४२७ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या घटनेने चंदगड सह कोल्हापूर जिल्हयात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी डिवायएसपी अंगद जाधवर यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल कव्हरेज क्षेत्राबाहेर होता
तडशिनहाळ येथील अरूण दरेकर व अक्षय मारूती गावडे या युवकाना एका गून्ह्यातून नाव काढतो असे सांगून दोघाकडून दोन लाख चाळीस हजार रूपये रक्कम उकळून फसवणूक प्रकरणी अटक असलेला गणेश फाटक याच्या पोलिस कोठडीत शूक्रवारपर्यंत तिसर्यादा वाढ झाली आहे.