गारगोटी येथील युवकांनी दिला लांडोरीला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:37 AM2021-02-23T04:37:59+5:302021-02-23T04:37:59+5:30
एव्हाना तिचे नामकरण ‘पक्या’ असं करण्यात आले होते. पक्याने सगळ्या घराचा ताबा घेतला होता. घरातील धान्य, चिकन, अंडी, भाजीपाला ...
एव्हाना तिचे नामकरण ‘पक्या’ असं करण्यात आले होते. पक्याने सगळ्या घराचा ताबा घेतला होता. घरातील धान्य, चिकन, अंडी, भाजीपाला खाऊन प्रथमेश झोपत असलेल्या अंथरूणाजवळ रात्री बसायचा!. त्याचा सर्वांना गोडवा लागला होता; पण तिला तिच्या घरी जंगलात पुन्हा सोडण्यासाठी हे युवक अधीर झाले होते. त्यांनी आज सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर आहेर यांच्याकडे त्या लांडोरीला सुपूर्द केले. यावेळी वनविभागातील बजरंग शिंदे, राहुल पाटील, खराडे, आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी त्या लांडोरीला जंगलात नेऊन सोडले.
प्राणिमात्रांवर दया करणाऱ्या या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो ओळ
जखमी पक्षाला जीवदान दिल्यावर किशोर आहेर यांच्याकडे सुपूर्द करताना प्रथमेश घाटगे, सत्यजित मुगडे, सोपान भोसले, आदी उपस्थित होते.