सामानगडावरील भूस्खलनाची गडहिंग्लज प्रांतांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:35+5:302021-07-28T04:26:35+5:30
गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे सामानगडावरील रस्त्यालगतच्या डोंगरकडांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्या परिसरातील चार कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले ...
गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे सामानगडावरील रस्त्यालगतच्या डोंगरकडांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्या परिसरातील चार कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. भू-स्खलनासंदर्भातील अहवाल भू-गर्भशास्त्र विभागाला तातडीने पाठविण्याच्या सूचना प्रांतांनी यावेळी तहसीलदारांना दिली.
दरम्यान, प्रांताधिकारी पांगारकर व तहसीलदार पारगे यांनी घटनास्थळाला समक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी चिंचेवाडीचे उपसरपंच संदीप नाईक, पोलीसपाटील सुरेश गुरव, ग्रामसेवक संजय पुकळे, रणजित चौगुले, सुभाष घेवडे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------------
भूगर्भतज्ज्ञांना बोलविणार..!
सामानगडावरील भूस्खलन नेमके कशामुळे झाले आहे याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. त्यासाठी भूगर्भतज्ज्ञांना पाचारण करण्यात येईल. अशी माहिती प्रांताधिकारी पांगारकर यांनी दिली.
-------------------------
फोटो ओळी : किल्ले सामानगड येथे भू-स्खलन झालेल्या भागाची प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांनी पाहणी केली. यावेळी संदीप नाईक, सुरेश गुरव, संजय पुकळे, रणजित चौगुले, सुभाष घेवडे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २७०७२०२१-गड-१५