गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये लेझरद्वारे मूळव्याधाची शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:21+5:302021-02-23T04:38:21+5:30
वारणानगर : येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे प्रथमच अत्याधुनिक लेझर मशीनद्वारे फिशर, भगंदर, मूळव्याध या आजारांसाठी शस्त्रक्रिया उपलब्ध झाल्या ...
वारणानगर : येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे प्रथमच अत्याधुनिक लेझर मशीनद्वारे फिशर, भगंदर, मूळव्याध या आजारांसाठी शस्त्रक्रिया उपलब्ध झाल्या असल्याची माहिती गॅलेक्सी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. विराज कोरे, डॉ. सुचेता कोरे, डॉ. सिद्धार्थ कोरे यांनी दिली.
ग्रामीण भागात प्रथमच वारणानगर सारख्या ठिकाणी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये डॉ. महादेव पाटील यांनी लेझरद्वारे यशस्वीरीत्या मूळव्याधाची शस्त्रक्रिया पार पाडली. लेझर शस्त्रक्रियेमध्ये कमीत कमी रक्तस्राव, कमीत कमी वेदना आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा अत्याधुनिक आहे. हॉस्पिटलमध्ये मूळव्याध फिशर, भगिंदर यांसारख्या आजारांसाठी अचूक निदान होण्यासाठी व्हिडिओप्रोक्टोस्कोपी तपासणीची सोय केली आहे.
नवीन लेझर मशीनचे उद्घाटन झाले.
यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. विराज कोरे, डॉ. सुचेता कोरे, डॉ. सिद्धार्थ कोरे, डॉ. महादेव पाटील, डॉ. महाजन, डॉ. कार्वेकर, प्रशासन अधिकारी वैभव चंद्रस, आनंद बादरे आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
..............................................
फोटो ओळी
वारणानगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे लेझर मशीनचे उद्घाटन प्रसंगी डॉ. महादेव पाटील, वैभव चंद्रस, आनंद बादरे, हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होत.