गणेशोत्सवातील मिरवणुकांमधील लेसर लाइटचा फटका, मोबाइल झाले खराब : अनेकांचे डोळेही चुरचुरले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 06:18 AM2022-09-02T06:18:56+5:302022-09-02T06:19:24+5:30
Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील अनेक मंडळांनी बुधवारी रात्री लेसर लाइटसह साउंड सिस्टीमचा वापर केला. या रंगीबेरंगी लाइट आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात जिल्ह्यातील हजारो जणांचे मोबाइल खराब झाले.
कोल्हापूर : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील अनेक मंडळांनी बुधवारी रात्री लेसर लाइटसह साउंड सिस्टीमचा वापर केला. या रंगीबेरंगी लाइट आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात जिल्ह्यातील हजारो जणांचे मोबाइल खराब झाले. अनेकांच्या डोळ्यातून पाणी येणे, चुरचुरणे आणि काहीजणांना अंधुक दिसणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
सरकारने यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध हटविल्यामुळे तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे. त्यात लेसर लाइट तर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. एका मंडळाने आणली म्हणून दुसरे मंडळही त्याच प्रकारचा झगमगाट करण्यात मागे राहिले नाही. हा रंगीबेरंगी झगमगाट आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करून ते स्टेटसला लावण्याच्या मोहापायी अनेकांना झटका बसला. अनेकांच्या मोबाइलच्या कॅमेऱ्यातील लेन्स आणि सेन्सरवर लेसर किरण थेट पडल्यामुळे ते बंद झाले, तर अनेकांच्या डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, चुरचुरणे समस्यांना सामोरे जावे लागले.
लेन्स सेन्सर होते डॅमेज
मोबाइल कॅमेऱ्यामधील लेन्सची हालचाल होण्यासाठी आयसी सेन्सर्स असतात. त्या सेन्सरवर थेट तीव्र प्रकाशाची लेसर किरणे पडली तर ते जळून जातात. त्यानंतर डिस्प्ले स्क्रीनवर उभी रेष येते आणि कॅमेरा कार्य करीत नाही.