अखेरच्या दिवशी किरणे गुडघ्यापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:58 AM2018-02-03T00:58:52+5:302018-02-03T00:58:55+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या उत्तरायणातील किरणोत्सव सोहळ्यात अखेरच्या तिसºया दिवशी शुक्रवारी सूर्याची मावळती किरणे ६ वाजून १९ मिनिटांनी देवीच्या गुडघ्यापर्यत पोहोचून लुप्त झाली.
अंबाबाई मंदिरात ३१ जानेवारी ते २ फेबु्रवारी (उत्तरायण), तर ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा होतो. शुक्रवारी उत्तरायणातील तिसºया व अखेरच्या दिवशी मावळत्या किरणांनी प्रथम महाद्वारातून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी प्रवेश केला. मिनिटागणिक किरणे पुढे सरकू लागली. यात कासव चौक (मणी मंडप) येथे ती सायंकाळी सहा वाजता पोहोचली; तर पहिली पायरी ६ वाजून ६ मिनिटांनी, तर दुसरी पायरी ६ वाजून ११ मिनिटांनी व तिसरी पायरी ६ वाजून १३ मिनिटांनी आणि ६ वाजून १६ मिनिटांनी चरणस्पर्श, ६ वाजून १९ मिनिटांनी किरणे गुडघ्यापर्यंत पोहोचून मूर्तीच्या डाव्या बाजूने लुप्त झाली.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उत्तरायणातील किरणोत्सव सोहळ्यात बुधवारी (दि. ३१ जाने.) किरणे पूर्ण पोहोचल्याने ती देवीच्या चेहºयापर्यंत गेली.
दुसºया दिवशी किरणांची तीव्रता कमी झाल्याने कमरेपर्यंत, तर तिसºया व अखेरच्या दिवशी देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचून ती लुप्त झाली. यात मानवनिर्मित अडथळेच कारणीभूत असल्याने ते काढून घेतल्यानंतर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव पूर्ण होईल, असे मत जाणकारांनी गेल्या तीन दिवसांतील अभ्यासावरून व्यक्त केले.
अखेरच्या दिवशी हा सोहळा पाहण्यासाठी गारेच्या गणपतीसमोरील एलईडी स्क्रीनसमोर हजारो भक्तांनी गर्दी केली होती. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अभ्यास समितीचे सदस्य व शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, सदस्या संगीता खाडे, प्रा. मिलिंद कारंजकर, आदी उपस्थित होते.
किरणे अशी पोहोचली
महाद्वार प्रवेशद्वार : ५ वाजून ३० मिनिटे
पालखी चौक : ५ वाजून ३६ मिनिटे
गणपती मंदिरामागे : ५ वाजून ५४ मिनिटे
कासव चौक (मणी मंडप) : ६ वाजता
पितळी उंबरठा : ६ वाजून ४ मिनिटे
खजिना चौक : ६ वाजून ६ मिनिटे
पहिली पायरी : ६ वाजून ९ मिनिटे
दुसरी पायरी : ६ वाजून ११ मिनिटे
तिसरी पायरी : ६ वाजून १३ मिनिटे
चरणस्पर्श : ६ वाजून १६ मिनिटे
गुडघ्यापर्यंत : ६ वाजून १९ मिनिटांनी पोहोचून डावीकडे लुप्त