‘बाजारगेट’मधील रस्त्यांच्या कामाला अखेर मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:51+5:302021-01-23T04:23:51+5:30
काेल्हापूर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ बाजारगेट प्रभागातील तीन प्रमुख रस्त्यांच्या अर्धवट थांबलेल्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ठेकेदाराने ...
काेल्हापूर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ बाजारगेट प्रभागातील तीन प्रमुख रस्त्यांच्या अर्धवट थांबलेल्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. राजकारण बाजूला ठेवा, प्रथम रस्ता करा, अशी नागरिकांनी भूमिका घेतल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले.
पापाची तिकटी येथील बजाप माजगावकर तालीम ते शाहू उद्यान, पापाची तिकटी (अर्बन बँक पिछाडीस गल्ली) ते शाहू उद्यान, डोर्ले कॉर्नर आणि जोशी गल्ली ते जुनी कुंभार गल्ली येथील रस्त्यांची कामे सुरू झाली होती. माजी आमदाराने येथील रस्ते महापालिकेच्या परवानगी, निविदेशिवाय केले जात असल्याचा आरोप केला. मात्र, जुनी कुंभार गल्ली येथील एका रस्त्याची परवानगी नसताना भीतीने सर्व चारही रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत ठेकेदारांनी बंद ठेवली होती. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
फोटो : २२०१२०२१ कोल बाजारगेट रस्ता न्यूज
ओळी : कोल्हापुरातील बाजार गेट प्रभाग क्रमांक ३१ मधील अर्धवट थांबलेले रस्त्याचे काम अखेर सुरू झाले.