१६८ घरकुलांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

By admin | Published: March 14, 2016 12:56 AM2016-03-14T00:56:32+5:302016-03-14T00:57:09+5:30

इचलकरंजीतील पोलिसांसाठी योजना : पोलिस अधीक्षकांची माहिती

In the last phase of the proposal of 168 houses | १६८ घरकुलांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

१६८ घरकुलांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

Next

इचलकरंजी : शहरातील पोलिसांच्या घरकुलाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून, कलानगर येथे आरक्षित जागेवर १६८ घरकुलांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना ते काम करतात त्याच ठिकाणी निवारा देण्यात येणार असून, पोलिस गृहनिर्माण मंडळाकडून त्याची मार्चअखेर अंमलबजावणी होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
तसेच जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांच्या इमारतीलगत महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सुविधांनी युक्त विश्रांती कक्ष बांधण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचे अनुदान संबंधित पोलिस स्थानकांकडे वर्ग करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस दलात महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित असल्यामुळे प्रत्येक ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे.
देशपांडे म्हणाले, पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती हा विषय शासन स्तरावर असल्याने यावर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. केवळ नव्याने निर्माण होणाऱ्या पोलिस ठाण्याचा परिसर लक्षात घेऊन तेथे पोलिसांची नियुक्ती करण्याचा अधिकार आम्हास आहेत. (प्रतिनिधी)


गुन्हे शाखेच्या खर्चाची चौकशी करणार
साधारणत: वर्षापूर्वी घडलेल्या पालनकर ज्वेलर्स दरोड्याच्या तपासाबाबत पोलिस अधीक्षक देशपांडे म्हणाले, दरोड्याचा तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यालय मागील दोन वर्षांत तिसऱ्यांदा स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयाची रंगरंगोटी व सुशोभीकरणासाठी करण्यात आलेला खर्च हा कोणाच्या परवानगीने केला आहे, याची माहिती घेतली जाईल आणि त्यासंबंधी सखोल चौकशी करू, असेही देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: In the last phase of the proposal of 168 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.