‘शाहू’चा गत हंगामासाठी २७५० रुपये अंतिम दर

By admin | Published: July 23, 2014 11:48 PM2014-07-23T23:48:39+5:302014-07-23T23:50:19+5:30

२०१३-१४ साठीही लवकरच दुसरा हप्ता जाहीर

Last price for 'Shahu' last season is Rs 2,750 | ‘शाहू’चा गत हंगामासाठी २७५० रुपये अंतिम दर

‘शाहू’चा गत हंगामासाठी २७५० रुपये अंतिम दर

Next

कागल : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गत २०१२-२०१३ च्या हंगामात गळितास आणखी ५० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. त्यामुळे गत हंगामाचा अंतिम दर २७५० रुपये झाला आहे.
विविध ऊस जातींसाठी दिलेले प्रतिटन ७० आणि १२० रुपये यांचा विचार करता ऊसदर २८२० ते २८७० रुपये झाला आहे. तसेच २०१३-१४ साठीही लवकरच दुसरा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष एस. के. मगदूम, कार्यकारी संचालक विजय औताडे, संचालक अमरसिंह घोरपडे, बॉबी माने, विजयसिंह जाधव, टी. ए. कांबळे, आदी उपस्थित होते.
सन २०१२-१३ साठी आलेल्या उसाला यापूर्वी २७०० रुपये प्रतिटन अदा केलेले आहेत. त्या हंगामात ८६०३२ या ऊस जातीला प्रतिटन ७० रुपये, तर ६७१ या ऊस जातीसाठी १२० रुपये जादा दर दिला आहे. अंतिम हप्त्याची रक्कम प्रतिटन ५० रुपयेमधून भागविकास निधी वजा जाता ३५ रुपयांप्रमाणे होणारी दोन कोटी ५२ लाख ४८ हजार रुपये रक्कम ३० जुलै २०१४ रोजी बॅँकेत वर्ग केली जाणार आहे. २७५० रुपये हा ऊसदर राज्यात सर्वाधिक आहे. याचबरोबर गत गळीत हंगाम २०१३-१४ साठीही ऊस जात अनुदान आणि १०० टक्के ऊसपुरवठा करणाऱ्यांसाठी प्रतिटन ५० रुपये अनुदानाची घोषणा सर्वसाधारण सभेत विक्रमसिंह राजेंनी केली होती. त्यानुसार अनुदानाची रक्कम चार कोटी पाच लाख ८७ हजार रुपये ही ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. १०० टक्के ऊसपुरवठा करणारे सर्वसाधारण ९२०० इतके शेतकरी असून, त्यापैकी २ लाख ५२ हजार मेट्रिक टन उसासाठी १ कोटी २६ लाख रुपये अदा केलेले असून उर्वरित १ लाख टनासाठी असे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. या गतसाली झालेल्या ऊस हंगामासाठी पहिला हप्ता २४०० रुपये, ऊस जात अनुदान ७० ते १२० रुपये आणि १०० टक्के ऊसपुरवठा अनुदान ५० रुपये असा २५२० ते २५७० रुपये याप्रमाणे दर दिला असून, लवकरच दुसऱ्या हप्त्याची घोषणा करण्यात येईल, असे समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट
केले.

नवीन साखर कारखान्यांना शुभेच्छा...
नवीन साखर कारखान्यांना शुभेच्छा...
मंत्री हसन मुश्रीफ यांचा संताजी घोरपडे कारखाना यावर्षी सुरू होत आहे. संजय घाटगे यांनीही ‘खांडसरी’ची घोषणा केली आहे. या प्रश्नावर समरजितसिंह घाटगे म्हणाले की, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत; कारण शाहू दूध संघ चालविताना आलेला अनुभव मोठा आहे. उद्योग-व्यवसाय म्हणून पाहिले तर स्पर्धा ही अटळ आहे. छत्रपती शाहू साखर कारखान्यावर आणि राजेंवर विश्वास असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आमच्या कारखान्याला स्पर्धेची चिंता नाही.

Web Title: Last price for 'Shahu' last season is Rs 2,750

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.