दहा वर्षांत ५४ लाख टपालांची आवक
By admin | Published: April 16, 2016 12:32 AM2016-04-16T00:32:24+5:302016-04-16T00:41:54+5:30
शासकीय कार्यालय : जिल्ह्यातील ३४ कार्यालयांत दाखल प्रकरणांपैकी ४९ लाखांचा निपटारा
प्रविण देसाई--कोल्हापूर --प्रत्यक्ष भेटून दिलेली निवेदने व पत्रव्यवहाराशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये आवक-जावकच्या माध्यमातून टपालाद्वारे विविध प्रकरणे येत असतात. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील ३४ कार्यालयांमध्ये अशी सुमारे ५४ लाख २० हजार २९९ प्रकरणे टपालाद्वारे दाखल झाली आहेत. यातील ४९ लाख १३ हजार ८७७ प्रकरणांचे निपटारा झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद व महापालिका या मोठ्या कार्यालयांमध्ये दररोज सरासरी ५०० टपाल येतात. जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाला दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी शासनाकडून जिल्ह्यातील विविध कार्यालयांमधील टपालाद्वारे येणाऱ्या प्रकरणांची माहिती मागविली होती. त्यातून कार्यालयातील कामाचा ताण किती आहे? टपालाद्वारे प्राप्त प्रकरणांच्या निकालांचे प्रमाण कसे आहे ही माहिती जाणून घेतली. ही माहिती जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तकार्यालयाला पाठविली.
शासकीय कार्यालयांमध्ये विविध राजकीय, सामाजिक प्रश्नांसंदर्भातील मागण्या, तक्रारी हे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे देण्याची पद्धत आहे; परंतु काही मागण्या, तक्रारी, शासकीय कार्यालयांमधील कामांचे पत्रव्यवहार हे टपालाद्वारेही पाठविण्याची पद्धत आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयांमध्ये आवक-जावक नोंद वही असते. त्यामध्ये दररोज येणाऱ्या टपालांची नोंद केली जाते. याकरिता एक कर्मचारी कार्यरत असतो. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व महापालिका या मोठ्या शासकीय कार्यालयांमध्ये दररोज सरासरी ५००पासून १०००पर्यंत टपाल येण्याचे प्रमाण आहे.
टपालांच्या आवक-जावकच्या नोंदीनुसार जिल्हा प्रशासनाने संकलित केलेल्या माहितीमध्ये गेल्या दहा वर्षांत जिल्हा परिषदेकडे सर्वाधिक २४ लाख १६ हजार ७८९ प्रकरणे टपालाद्वारे आली आहेत. त्या खालोखाल पोलिस अधीक्षक कार्यालयांमध्ये ३ लाख १८ हजार ६० व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये २ लाख ५५ हजार ५६५ प्रकरणे आली आहेत. यासह इतर ३२ कार्यालयांमधील प्रमाण सरासरी १ लाखाच्या आसपास आहे.
कार्यालयाचे नावएकूण संख्यानिर्गतीकरण
जिल्हा परिषद २४१६७८९२४१४८८३
पोलिस अधीक्षक कार्यालय३१८०६०२७४५५२
जिल्हाधिकारी कार्यालय२५५५६५८८०२२
एस. टी. महामंडळ८६४८९८६४७१
सार्वजनिक बांधकाम विभाग१३२८८९११०५३६
पाटबंधारे विभाग१२८५१४१०५८६७
विक्रीकर कार्यालय२०३२९८९६७२२
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)११५९९७११६९९१
जिल्हा सांख्यिकी कार्यालय१४१९७१४१९७
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय१४९४६१४९४६
राज्य उत्पादन शुल्क कार्यालय९६८७८९६८७८
सहायक जिल्हा निबंधक (मुद्रांक) कार्यालय८१२०२७५६२०
जिल्हा कोषागार कार्यालय१४८९६६१४८९६१
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)९०२९०८३१९८
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन४८०४५४५०००
अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय६९३३८६९२४२
सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार४९१७७४९१७७
कार्यालयाचे नावएकूण संख्यानिर्गतीकरण
विशेष समाजकल्याण अधिकारी३१०८७२५००८
जिल्हा उद्योग केंद्र ३८०२१०
जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी३४१४४३१५७५
जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी१४७१५१४७१५
सहायक कामगार आयुक्त कार्यालय६३९३०५२३८१
जिल्हा मस्त्य व्यवसाय अधीक्षक११२२३२३०२९
जिल्हा दुग्धविकास अधिकारी९४५०९०२०
जिल्हा महिती अधिकारी३४३९२३०७२९
उपवनसंरक्षक, वनविभाग१०७२८५७४१८३
जिल्हा व सत्र न्यायालय४५२५११४५३०७८
जिल्हा विशेष लेखापरीक्षक ६८१७८२२८६७
जिल्हा कृषी अधिकारी१७२३८९१०५५३५
अधीक्षक, जिल्हा होमगार्ड १२००९११८९०
जिल्हा सैनिक कार्यालय ६९१९५६९१९५
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ५९७७५९७७
औद्योगिक प्रशिक्षण संस्था५८०१०५८०१०
जिल्हा तुरुंग अधिकारी कार्यालय, बिंदू चौक २००००२००००