दहा वर्षांत २८० कोटींचे कर्ज थकले

By admin | Published: June 13, 2017 01:09 AM2017-06-13T01:09:57+5:302017-06-13T01:09:57+5:30

केंद्राच्या कर्जमाफीनंतरची स्थिती : ३७ हजार शेतकरी जिल्हा बॅँकेचे पुन्हा थकबाकीदार

In the last ten years, the debt of 280 crores was tired | दहा वर्षांत २८० कोटींचे कर्ज थकले

दहा वर्षांत २८० कोटींचे कर्ज थकले

Next

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीनंतर दहा वर्षाने राज्याने कर्जमाफी जाहीर केली आहे; पण जिल्हा बँकेशी संलग्न कर्जपुरवठा व थकबाकीदारांची संख्या पाहिली तर गेल्या दहा वर्षांत जवळपास ३७ हजार शेतकरी पुन्हा थकबाकीदार झाले असून, त्यांचे २८० कोटींचे कर्ज थकले आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारने २००८ ला देशातील शेतकऱ्यांना तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. सततची नापिकी व शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबर २००७ अखेर थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा व धाडसी निर्णय घेतला होता. कर्ज थकविणाऱ्यांनाच कर्जमाफी दिल्याने राज्यात कमालीचा असंतोष पसरल्याने राज्य सरकारने प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपयांची सरसकट कर्जमाफी केली. जिल्हा बँकेच्या पातळीवर केंद्राच्या कर्जमाफीतून २७४ कोटींची कर्जमाफी झाली. त्यातील ‘नाबार्ड’ने ११२ कोटी अपात्र ठरविले होते. अपात्र रकमेपैकी सुमारे ४७ कोटींची वसुली बँक पातळीवर झालेली आहे. त्यामुळे सध्याच्या ३४५ कोटींच्या थकबाकीत अपात्रमधील ६५ कोटी दिसत आहेत. ढोबळमानाने गेल्या दहा वर्षांत ३७ हजार शेतकऱ्यांकडे २८० कोटी थकल्याचे स्पष्ट होते.

पाच एकरांवरील३७८४ थकबाकीदार
राज्य सरकारने पाच एकराच्या आतील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याने जिल्ह्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे; पण जिल्हा बँकेचे पाच एकरावरील ३ हजार ७८४ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे तब्बल २२ कोटी १० लाखाची थकीत कर्ज आहे. या शेतकऱ्यांच्या वसुलीचा मोठा प्रश्न जिल्हा बँकेसमोर आहे.

दृष्टिक्षेपात केंद्राची कर्जमाफी
थकबाकी - १ एप्रिल १९९७ ते ३१ डिसेंबर २००७ पर्यंत
जिल्हा बँकेने सादर केलेला प्रस्ताव - २ लाख ९ हजार
३१९ शेतकरी
रक्कम - २९३ कोटी ७८ लाख
मंजूर - २७४ कोटी
अपात्र- ११२ कोटी (४४ हजार ६५९ खाती)
प्रत्यक्षात लाभ- १६१ कोटी ११ लाख

जिल्हा बँकेचे कर्ज वाटप
पाच एकरांपर्यंत
शेतकरी - २ लाख ९ हजार ५११
कर्ज- १५१५ कोटी
पाच एकरांवरील
शेतकरी-५६ हजार ९२
कर्ज-४८४ कोटी

Web Title: In the last ten years, the debt of 280 crores was tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.