...अखेर आजरा नगरपंचायत मंजूर--अशोक चराटींच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:50 AM2017-09-14T00:50:17+5:302017-09-14T00:51:45+5:30

कोल्हापूर/पेरणोली : आजरा ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना निघण्याच्या आधी १२ तास आजरा नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली

 Lastly, the Azara Nagar Panchayat approved - Ashok Chararti's efforts to achieve success | ...अखेर आजरा नगरपंचायत मंजूर--अशोक चराटींच्या प्रयत्नांना यश

...अखेर आजरा नगरपंचायत मंजूर--अशोक चराटींच्या प्रयत्नांना यश

Next
ठळक मुद्दे : चंद्रकांतदादा पाटील यांनी पाळला ‘शब्द’

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर/पेरणोली : आजरा ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना निघण्याच्या आधी १२ तास आजरा नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने बुधवारी संध्याकाळी तशी अधिसूचना काढली असून, आजरा तहसीलदार यांची ‘प्रशासक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय समजल्यानंतर आजरा शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

गेली पाच वर्षे आजरा नगरपंचायतीचा विषय गाजत होता. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भाजपप्रवेशावेळी आजरा नगरपंचायतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पाच महिने उलटून गेल्यानंतरही नगरपंचायत मंजूर होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. मात्र, चराटी यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे पाठपुरावा करत कोणत्याही परिस्थितीत आजरा नगरपंचायत स्थापन करण्याचा आग्रह धरला होता.

मात्र, राज्यातील सर्वच तालुकास्तरीय ग्रामपंचायती नगरपंचायती करण्याचा धोरणात्मक निर्णय झाल्याने आणि सध्याच्या स्थितीत या निर्णयाची अंमलबजावणी करणे अशक्य असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यासाठी फारसे अनुकूल नव्हते. मात्र, नंतर त्यांनाही राजी करण्यात आले. अशातच आजरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा पेच वाढला. जिल्ह्यात आचारसंहिता जाहीर झाल्याने त्याचे गांभीर्यही वाढले. आता नगरपंचायत होणार नाही, असे वातावरण असताना चराटी आणि त्यांच्या सहकाºयांनी पालकमंत्र्यांना भेटून टोकाचा आग्रह धरला.
सर्वजण पुन्हा मंगळवारी मुंबईला रवाना झाले. मात्र, यासाठीच्या प्रस्तावावर पाच मंत्र्यांच्या सह्यांची गरज होती. अखेर मंत्री पाटील यांनी दोन दिवसांत ताकद पणाला लावत बुधवारी याबाबत अधिसूचना काढून घेतली आणि अशक्य वाटणाºया आजरा नगरपंचायतीच्या स्थापनेची अधिसूचना निघाली. शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अनिष परशुरामे यांनी ही अधिसूचना काढली. चराटी यांच्यासमवेत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास नाईक, आजरा अर्बनचे संचालक सुरेश गड्डी, आजरा साखर कारखान्याचे संचालक दशरथ अमृते, निवृत्ती शेंडे मुंबईत या कामामध्ये सहभागी झाले होते.

नगरपंचायत स्थापन झाल्याची बातमी कळताच आजºयात आजरा अर्बन बँकेसमोर, शिवाजी पुतळ्यासमोर, संभाजी चौक, शिवाजीनगर येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचारी तर गुलालात न्हाले होते.
हाळवणकरांचे ‘शब्द’ ठरले खरे

वीस दिवसांपूर्वी आमदार सुरेश हाळवणकर यांना आजरा नगरपंचायतीबाबत विचारणा करण्यात आली होती तेव्हा आमची सत्ता आहे. आम्ही ठरवल्यानंतर कामात कोणतीही अडचण येणार नाही, असे हाळवणकर म्हणाले होते. त्याची प्रचिती या निमित्ताने आली.
आता अन्य ठिकाणची प्रतीक्षाकोल्हापूर जिल्ह्यातून डिसेंबर २०१४ला आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा या तालुकास्तरीय ग्रामपंचायतींचा नगरपंचायतींसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शिरोळनेही याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, त्यात आजºयाने बाजी मारली.

जि. प., पंचायत समितीतून आजºयाला वगळले
याच आदेशामध्ये जिल्हा परिषदेच्या आजरा गटातून आणि पंचायत समितीच्या आजरा गणातून आजरा शहर १३ सप्टेंबरपासून वगळण्यात आल्याची अधिसूचनाही ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांनी काढली आहे. त्यामुळे या पुढच्या काळात जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये आजरा शहराचा विचार केला जाणार नाही.

निवडणूक आयोगाकडे मागितले मार्गदर्शन
बुधवारी संध्याकाळी आजरा नगरपंचायतीच्या स्थापनेची अधिसूचना निघाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातही गडबड उडाली. आज (गुरुवारी) आजरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अधिसूचना निघणार असल्याने तातडीने याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आले असून याबाबतही मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

आजरा तहसीलदार प्रशासकपदी
याच अधिसूचनेपाठोपाठ आजºयाच्या तहसीलदारांची आजरा ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचाही आदेश काढण्यात आला. नगरपंचायत स्थापन होऊन मुख्याधिकारी नेमणूक होईपर्यंत आता तहसीलदार प्रशासक म्हणून काम पाहतील.
दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी
दुपारी एकीकडे मंत्रालयात आजरा नगरपंचायतीच्या स्थापनेची कागदपत्रे तयार होत असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास विभागाने आजºयात आचारसंहिता आहे का आजरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे का, अशी दूरध्वनीवरून विचारणा केली. आचारसंहिता असून निवडणूक लागल्याचे येथून सांगण्यात आले. यावेळी आचारसंहितेची अडचण येईल असे वाटत होते. मात्र, त्यानंतर दीड तासांतच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरविकास विभागात अधिसूचनेला मेल आल

हे संपूर्ण श्रेय भाजपचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक यांचे याकामी सहकार्य लाभले. याच कामासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील एक ‘शब्द’ दादांनी पाळला आहे. आता आजरा तालुक्यातील पाणी प्रकल्प, रस्ते यासाठी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषदेच्या पराभवानंतरही सर्वसामान्य जनतेने या लढ्यासाठी मला पाठबळ दिले. याच जोरावर हे काम आम्ही करू शकलो.
- अशोक चराटी, अध्यक्ष, आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना

Web Title:  Lastly, the Azara Nagar Panchayat approved - Ashok Chararti's efforts to achieve success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.