लतादीदी आणि 'आनंदघन' नावामागील इंटरेस्टिंग स्टोरी, का निवडलं वेगळं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 02:05 PM2022-02-06T14:05:54+5:302022-02-06T14:14:26+5:30

अन् 'त्या' नावामागील व्यक्ती समजली

Lata Mangeshkar started her career as a musician under the pseudonym Anandghan | लतादीदी आणि 'आनंदघन' नावामागील इंटरेस्टिंग स्टोरी, का निवडलं वेगळं नाव

लतादीदी आणि 'आनंदघन' नावामागील इंटरेस्टिंग स्टोरी, का निवडलं वेगळं नाव

googlenewsNext

कोल्हापूर : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनाची बातमी समजताच देशभरात शोकाकुल वातावरण झाले. आपल्या सुरेल आवाजानी त्यांनी करोडो रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. आज हा आवाज हरपला. 

लता दीदींनी बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली. आजही त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी लोकांना माहित नाहीत. जसे की त्यांच्या नावामागचा किस्सादेखील. जन्मावेळी लता यांचे नाव हेमा ठेवले होते. परंतु एकदा त्यांचे वडील दीनानाथ यांनी भावबंधन नाटकात काम केले. ज्यात एका महिला पात्राचे नाव लतिका होते. दीनानाथ मंगेशकर यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी लगेच लेकीचं नाव हेमा बदलून लता ठेवले. ही तिच छोटी हेमा आहे, ज्यांना आज संपूर्ण जग लता मंगेशकर या नावाने ओळखते.

याचप्रमाणे गायनातही त्याचे एक टोपणनाव होते. हे आज देखील काही जणांना माहित नसेल. लतादीदी गायनाच्या अत्युच्च कारकिर्दीवर होत्या. त्यांच्या गायन कारकिर्दीवर त्याचा परिणाम होईल म्हणून भालजी पेंढारकर यांनी त्यांना टोपणनावाने गाण्यास सुचवलं. अन् 'आनंदघन' या नावाने संगीतकार म्हणून कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली.

आनंदघनची पार्श्वभूमी

लता मंगेशकर यांनी भालजी पेंढारकर यांच्या साधी माणसं या चित्रपटाला पहिल्यांदा संगीत दिले. त्यावेळी लतादीदी गायनाच्या अत्युच्च कारकिर्दीवर होत्या. हा चित्रपट चालला नाही तर त्यांच्या गायन कारकिर्दीवर त्याचा परिणाम होईल अशी भालजींना भीती होती म्हणून सुरुवातीला त्यांनी लतादीदींना नकार दिला. यावर तोडगा काढत लता मंगेशकर यांनी टोपण नावाने संगीत देण्यास तयारी दर्शवली. 

'आनंदघन' या नावाने संगीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. अन् पार्श्वगायन आणि संगीतासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला. झाल्यानंतर अखेर लता मंगेशकर यांनी रंगमंचावर जाऊन पुरस्कार स्वीकारल्यावर आनंदघन नावामागील व्यक्ती समजली.

Web Title: Lata Mangeshkar started her career as a musician under the pseudonym Anandghan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.