गडमुडशिंगीत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:48+5:302021-08-18T04:28:48+5:30
गडमुडशिंगी (ता. करवीर) परिसरातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड- १९ लसीकरणाची मोहीम मराठी शाळेत सुरू करण्यात ...
गडमुडशिंगी (ता. करवीर) परिसरातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड- १९ लसीकरणाची मोहीम मराठी शाळेत सुरू करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्या वंदना पाटील, करवीर पं. स. समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, पं. स. सदस्या शोभा राजमाने, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संतोष कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडमुडशिंगी परिसरात लसीकरण मोहीम उपलब्धता करण्यासाठी करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे, रुग्ण कल्याण समिती सदस्य संतोष कांबळे यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ॠतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयास निवेदन देऊन लसीकरण केंद्र मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी करून घेतले आहे. परिसरातील युवकांना लसीकरणाचा लाभ होण्यासाठी मदत होणार आहे. या कार्यक्रमास विजय पाटील, ग्रा.पं. सदस्य रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, आप्पासाहेब धनवडे, राजाराम ठमके, जितेंद्र कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवाना मुल्ला, आरोग्य सेविका संध्या महाजन, मेघा गायकवाड, वर्षा पाटील, छाया मालप, राजश्री रामनकट्टे व नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळ : गडमुडशिंगी येथे १८ ते ४४ वयोगटातील युवकांना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्य वंदना पाटील, प्रदीप झांबरे, रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.