‘लोकमत एज्युकेशनल फेअर’चा आज प्रारंभ -- करिअरविषयक माहिती एकाच छताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:04 AM2019-06-08T01:04:51+5:302019-06-08T01:05:17+5:30
‘तुमचे यश हेच आमचे ध्येय’ हे ब्रीद घेऊन यावर्षी ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअर आयोजित केले आहे. त्यामध्ये विविध करिअरच्या संधी आणि शैक्षणिक संस्थांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे. कोल्हापुरात आज, शनिवार ते सोमवार (दि. १०) पर्यंत हे प्रदर्शन होणार आहे.
कोल्हापूर : ‘तुमचे यश हेच आमचे ध्येय’ हे ब्रीद घेऊन यावर्षी ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअर आयोजित केले आहे. त्यामध्ये विविध करिअरच्या संधी आणि शैक्षणिक संस्थांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे. कोल्हापुरात आज, शनिवार ते सोमवार (दि. १०) पर्यंत हे प्रदर्शन होणार आहे. त्यात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच विविध बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे होणाऱ्या या प्रदर्शनास ‘द युनिक अकॅडमी, पुणे’चे प्रायोजकत्व, तर अॅमिटी युनिव्हर्सिटीचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. बँकिंग पार्टनर म्हणून ‘एसबीआय’ आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आज, शनिवारी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मा. प्रविण बगे (द युनिक अकॅडमी, पुणे), मा. डॉ. अरुण पाटील (कुलगुरू, अॅमिटी युनिव्हर्सिटी, जयपूर, राजस्थान) चंद्रकांत नौकुडकर (चीफ मॅनेजर, आर. बी. ओ., कोल्हापूर) प्रमुख उपस्थित असणार आहेत. या प्रदर्शनात शैक्षणिक संस्थांच्या माहितीसह मुलांच्या व्यक्तिमत्त्व कौशल्याचा विकास, बुद्धिमत्ता विकासाला चालना देण्यासाठी विविध स्पर्धा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. त्यात आज, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता रोबोटिक वर्कशॉप होणार असून, सुधीर पाटील मार्गदर्शन करणार आहेत. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवरील ‘कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल’ स्पर्धा उद्या, रविवारी सकाळी १० वाजता होणार आहे. विज्ञानावर आधारित असलेली ‘सायन्स पंडित’ स्पर्धा सोमवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता होणार आहे. या स्पर्धांमध्ये हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता ‘टेराकोटा जर्नी’ या विषयावर गौरव कार्इंगडे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनात सहभागी शैक्षणिक संस्था या विद्यार्थी, पालक यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून, त्यांना माहिती देणार आहेत.
रोबो, कॅलिग्राफी, पॉट मेकिंगची संधी
प्रदर्शनातून तंत्र , टेराकोटा पॉट मेकिंग आदी कौशल्य विकासाची संधी उपलब्ध होणार आहे. चला रोबो बनवुया याअंतर्गत रोबोचे प्रकार, त्यांचे सुटे भाग, आदींच्या माहितीसह रोबो बनविण्याचे प्रात्यक्षिक होणार आहे.
ज्ञानातून सक्षमीकरण करणारी ‘द युनिक अकॅडमी’
या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘द युनिक अकॅडमी’ आहे. ‘ज्ञानातून सक्षमीकरण’ हे ब्रीदवाक्य घेऊन द युनिक अकॅडमीची स्थापना झाली आहे. अकॅडमीतर्फे यूपीएससी व एमपीएससी या परीक्षांसाठी इंटिग्रेटेड, वैकल्पिक विषय, पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी माध्यमांतून कोर्सेस चालविले जातात. त्याचबरोबर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयएएस फाउंडेशन कोर्सही चालविले जातात. पदवी काळातच विद्यार्थ्यांना ‘यूपीएससी’ची तयारी करता यावी, यासाठी अकॅडमीतर्फे थ्री इयर्स इंटिग्रेटेड बॅचही सुरू आहे. यासह अकॅडमीतील व अकॅडमीबाहेरील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी व एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या टेस्ट सीरिज घेतल्या जातात.
पुणे हे मुख्य केंद्र असून, महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या ठिकाणी शाखा सुरू आहेत. सातारा, कºहाड, इस्लामपूर येथे शाखा आहेत. स्थापनेपासून या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन १0 हजार विद्यार्थी अधिकारी झाले आहेत. काही ठिकाणी निवासी वर्गाची सोय उपलब्ध आहे.
चांदीचे नाणे, सेल्फी स्टिक मिळवा
या प्रदर्शनातील सेमिनारमध्ये सहभागी होणाºया प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याला सेल्फी स्टिक मिळणार आहे. त्यासह प्रदर्शनाला भेट देऊन प्रत्येक तासाला चांदीचे नाणे जिंकण्याची संधी आहे. भेट देणाºया विद्यार्थ्यांकडून लकी ड्रॉसाठी कूपन भरून घेतले जाणार आहे. त्यातील विजेत्याला बक्षीस म्हणून टॅब्लेट मिळणार आहे.
आज, शनिवारी
दुपारी ४ वाजता : इम्पॉर्टन्स आॅफ इंग्लिश (मार्गदर्शक : राजीव नाईक)
सायंकाळी ५ वाजता : करिअर : एक चिंतन (चारूदत्त रणदिवे)
सायंकाळी ६.३० रोबोटिक वर्कशॉप - मार्गदर्शक : सुधीर पाटील
प्रदर्शनात रविवारी (दि. ९) होणारे कार्यक्रम
स.१० वाजता : कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल स्पर्धा
सकाळी ११ वाजता : एमपीएससी, यूपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत सेमिनार (प्रवीण बगे)
दुपारी १२ वाजता : करिअर प्लॅनिंग (प्रसाद कुलकर्णी)
दुपारी ४ वाजता : परदेशातील शैक्षणिक संधी (कुणाल पाटील)
सायंकाळी ५ वाजता : दहावीनंतर करिअर निवडताना (डॉ. विराट गिरी)
सोमवारी (दि. १०)
सकाळी ११ वाजता : सायन्स आणि मॅथ्स पंडित स्पर्धा
दुपारी १२ वाजता : दहावीतून पुढील शिक्षणाकडे जाताना सेमिनार (प्रा. भारत खराटे)
दुपारी ४ वाजता : करिअरच्या संधी (डॉ. डी. एन. मुदगल)
सायंकाळी ५ वाजता : एसबीआय ठेव योजना आणि इतर (चंद्रकांत नौकूडकर)