महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:09+5:302021-03-10T04:25:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १ कोटीहून अधिक मास्कचे उत्पादन करून कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग ...

Launch of Mahasamrudhi Women Empowerment Campaign | महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा प्रारंभ

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १ कोटीहून अधिक मास्कचे उत्पादन करून कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग दिला. या माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. तुम्ही गरुडभरारी घ्या, तुमच्या पंखांमध्ये बळ देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील सुमारे १ लाख महिलांशी संवाद साधला.

ग्रामविकास विभागामार्फत सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये जागतिक महिला दिन ते जागतिक पर्यावरण दिन (५ जून) या कालावधीत ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येणार आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सोमवारी झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात उत्पादित होणारी विशेष उत्पादने लक्षात घेऊन बचतगटांनी त्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करावे. या उत्पादनांना आपण राज्य, देश आणि जागतिक पातळीवर मार्केट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. सध्या सेंद्रीय उत्पादनांना शहरांमध्ये मोठी मागणी असून महिलांनी ही संधी ओळखून सेंद्रीय उत्पादनाचे व्यवसाय सुरू करावेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाप्रमाणे सर्वांनी मिळून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ यशस्वी करावे.

ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ म्हणाले, या अभियानातून पुढील तीन महिने ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबविण्यात येतील. ‘शेत दोघांचे, घर दोघांचे’ उपक्रमातून मालमत्तेवर महिलेचेही नाव असावे याला चालना देण्यात येईल. महिलांमधील तंबाखुमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती यासाठी मोठी जनजागृती केला जाईल. महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांचे हिमोग्लोबीन व बीएमआय तपासणी करून त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचबरोबर कौटुंबीक हिंसाचार रोखणे व महिलांना कायदेविषयक सहाय्य व सल्ला देण्याबाबत उपक्रम राबविण्यात येईल.

फोटो ओळी : महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाची मार्गदर्शक पुस्तिका, घडीपत्रिका, कॉपशॉपचा लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होते. (फोटो-०९०३२०२१-कोल-महासमृध्दी)

Web Title: Launch of Mahasamrudhi Women Empowerment Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.