कोपार्डे येथे पोषण महाअभियानाचा शुभारंभ -जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:57+5:302021-09-05T04:28:57+5:30
कोपार्डे : कुपोषण रोखण्यासाठी आहार महत्त्वाचा भूमिका बजावत असून याची पालक व पाल्य यांच्यात प्रबोधन करण्यासाठी एकात्मिक बाल विकास ...
कोपार्डे : कुपोषण रोखण्यासाठी आहार महत्त्वाचा भूमिका बजावत असून याची पालक व पाल्य यांच्यात प्रबोधन करण्यासाठी एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत दरवर्षी पोषण महाचे आयोजन केले जाते. यात अंगणवाड्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती रसिका पाटील यांनी व्यक्त केले
कोपार्डे (ता. करवीर) येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प करवीर-२ अंतर्गत बीट सांगरूळ-३ च्या वतीन ‘पोषण महाचा’ शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिक्षण व अर्थ सभापती रसिका पाटील बोलत होत्या. पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोषण साखळीचे आयोजन करण्यात आले होते. रसिका पाटील यांच्या हस्ते बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. पोषण प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील, पर्यवेक्षिका अश्विनी पाटील, शोभा पाटील, सारिका पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
040921\dsc_5985.jpg
फोटो
कोपार्डे (ता. करवीर) येथे एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत 'पोषण महा' योजनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षण व अर्थ सभापती रसिका पाटील, करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील ज्योती पाटील व अंगणवाडी सेविका