इंडियन रेडक्रॉसच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सेवेचा टोपेंच्या हस्ते प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:33+5:302021-07-20T04:17:33+5:30

कोल्हापूर : गरजू कोरोना रूग्णांना ऑक्सिजन ...

Launch of Oxygen Concentrator Service of Indian Red Cross | इंडियन रेडक्रॉसच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सेवेचा टोपेंच्या हस्ते प्रारंभ

इंडियन रेडक्रॉसच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सेवेचा टोपेंच्या हस्ते प्रारंभ

Next

कोल्हापूर : गरजू कोरोना रूग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्याच्या सेवेचा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, शाहू ब्लड बॅंकेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखाराव, सतीशराज जगदाळे उपस्थित होते.

हे कॉन्सन्ट्रेटर विनामूल्य वापरण्यासाठी दिले जाणार असले तरी त्यासाठी १५ हजार रूपये अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. जी नंतर पावती दाखवून परत मिळू शकेल. डॉक्टरांच्या लेखी पत्रानुसारच कॉन्सन्ट्रेटर दिले जाणार आहेत. परस्पर अन्य रूग्णाला हे मशीन देण्यास मनाई असून, डाॅक्टरांच्या पत्रानुसार १४ दिवसांहून अधिक काळासाठीही कॉन्सन्ट्रेटर दिला जाणार आहे. परतीवेळी मात्र मास्क आणि ऑक्सिजन पाईप बदलावा लागत असल्याने ५०० रूपये भरावे लागणार आहेत. शाहू ब्लड बॅंकेतच हे कॉन्सन्ट्रेटर मिळणार आहेत.

१९०७२०२१ कोल इंडियन रेडक्रॉस

इंडियन रेडक्रॉसच्यावतीने गरजू कोरोना रूग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्याच्या सेवेचा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्ही. बी. पाटील, शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखाराव, आमदार ऋतुराज पाटील, सतीशराज जगदाळे उपस्थित होते.

Web Title: Launch of Oxygen Concentrator Service of Indian Red Cross

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.