ग्रीन पार्क ते शांतिनिकेतन स्कूल मार्गावरील रस्ते कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 02:16 PM2019-12-05T14:16:48+5:302019-12-05T14:17:57+5:30
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या ग्रीन पार्क ते शांतीनिकेतन स्कूल मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. दक्षिणचे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या ग्रीन पार्क ते शांतीनिकेतन स्कूल मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. दक्षिणचे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाचगाव, मोरेवाडी, आर.के. नगर, सानेगुरुजी, सम्राटनगर या उपनगरातून शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल एमआयडीसीसह पुणे बेंगलोर नॅशनल हायवेकडे जाण्यासाठी उपनगरातील नागरिकांसाठी सर्वात जवळाचा रस्ता म्हणजे शांतीनिकेतन स्कूल रोड होय.अतिवृष्टीमुळे हा मार्ग अत्यंत खराब झाला होता.
मार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वारंवार अपघाताचे प्रकार घडत होते. ही बाबा तत्काळ लक्षात घेऊन दक्षिण नूतन आमदार ऋतुराज पाटील यांनी गुरुवारी या रस्त्यांची डागडुजी न करत पुन्हा नव्याने करण्याच्या कामास प्रारंभ केला. सुमारे बारा लाख रुपयांचा खर्च या कामासाठी अपेक्षित आहे.
याप्रसंगी स्थायी सभापती शारगंधर देशमुख, नगरसेवक लाला भोसले, शशिकांत पाटील, माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषा वास्कर, सुनिल शिंदे, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, माजी उपसरपंच राजू वाली, ग्रामपंचायत सदस्या सुनिता जाधव, राजू साबळे, विराज पाटील, राजू माने, हेमंत उलपे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेष्ठांच्या हस्ते उद्घाटन
दक्षिणचे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांचा पहिलाच कार्यक्रम असून सुध्दा त्यांनी या कामाचा नारळ स्वत:च्या हस्ते न फोडता भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते फोडण्यात आला. उद्घाटनाचा मान मुरलीधर आळतेकर, बी. डी. पाटील, चंद्रकांत पाटील, सुलतान मुल्ला, दिनकर चव्हाण, शहाजी फराकटे या जेष्ठ नागरिकांना मिळाला.