गडहिंग्लजमध्ये 'हिरण्यकेशी वाचवा' अभियानाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:35+5:302021-03-20T04:22:35+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लजची जीवनदायिनी हिरण्यकेशी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शिवसेनेतर्फे 'हिरण्यकेशी वाचवा' अभियान सुरू करण्यात आले. आज, (शुक्रवारी) दुपारी येथील ...
गडहिंग्लज : गडहिंग्लजची जीवनदायिनी हिरण्यकेशी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शिवसेनेतर्फे 'हिरण्यकेशी वाचवा' अभियान सुरू करण्यात आले. आज, (शुक्रवारी) दुपारी येथील नदीवरील घाटावर जलपूजन करून शिवसैनिकांनी शपथ घेतली.
जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्याहस्ते जलपूजन झाले. नदीत निर्माल्य टाकणार नाही, उद्योगधंदे व कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडणार नाही, कोणत्याही निरुपयोगी वस्तू नदीत फेकणार नाही, अशी शपथ घेण्यात आली.
नदीचे पाणी दूषित होऊ नये म्हणून शिवसेनेने हिरण्यकेशी वाचवा अभियानास सुरुवात केली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. 'मी हिरण्यकेशी नदीचा... हिरण्यकेशी नदी माझी...' या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका प्रमुख दिलीप माने यांनी शपथ दिली. यावेळी रियाज शमनजी, वसंत नाईक, दिगंबर पाटील, आनंद माने, प्रकाश रावळ, काशिनाथ गडकरी, अशोक खोत, प्रतीक क्षीरसागर, दिनेश कुंभीरकर, मंगल जाधव, किशोरी शेवाळे, मालुताई चौगुले, शालन कासारीकर, प्रियांका पाटील आदी उपस्थित होते.
---
* फोटो ओळी :
गडहिंग्लज येथे शिवसैनिकांनी हिरण्यकेशी वाचविण्याची शपथ घेतली. यावेळी विजय देवणे, दिलीप माने, वसंत नाईक, मालुताई चौगुले, शालन कासारीकर आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : १९०३२०२१-गड-०२