खानापूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:23+5:302021-03-31T04:25:23+5:30

ते खानापूर ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते. सत्कारापूर्वी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Launch of various development works at Khanapur | खानापूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

खानापूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

googlenewsNext

ते खानापूर ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते. सत्कारापूर्वी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आबिटकर म्हणाले, खानापूर ग्रामपंचायतीवर बाळासाहेब भोपळे व प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली रांगणामाऊली ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र काम करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळात गावातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

स्वागत बाळासो भोपळे यांनी केले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आमदार आबिटकर व ज्येष्ठ नेते बी. एस. देसाई यांच्या हस्ते नूतन सरपंच शोभाताई गुरव व उपसरपंच राजेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मानसिंग दबडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ‘बिद्री’चे माजी संचालक के. जी. नांदेकर, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, बाबा नांदेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सरपंच धनाजी खोत, सभापती कीर्तीताई देसाई, पं. स. सदस्या स्नेहल परीट, सदस्य अजित देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, सूर्याजी देसाई, ग्रामपंचायत सदस्या शीलाताई घरपणकर, वैष्णवी कांबळे, के. टी. कांबळे, धीरज भोपळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज नाईक यांनी केले. आभार अशोक वारके यांनी मानले.

फोटो : सरपंच शोभाताई गुरव व उपसरपंच राजेंद्र पाटील यांचा सत्कार करताना आमदार आबिटकर, बी. एस. देसाई, के. जी. नांदेकर, नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले आदी मान्यवर.

Web Title: Launch of various development works at Khanapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.