राजकीय दबावावर नव्हे, लोकहितावर बनतात कायदे :विलास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 05:13 PM2020-02-07T17:13:02+5:302020-02-07T17:38:08+5:30
धोरण राबविताना राजकीय दबाव होतो. मात्र, कायदे राजकीय दबावावर होतात, असे नाही. लोकांना विचारात घेऊनच कायदे केले जातात. कायदे करताना संविधानातील तरतुदीला विसंगत होणार नाही, रुढी परंपरांना ठेच लागणार नाही, याची विशेष दक्षता प्रशासकीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचे सहसचिव विलास आठवले यांनी केले.
कोल्हापूर : धोरण राबविताना राजकीय दबाव होतो. मात्र, कायदे राजकीय दबावावर होतात, असे नाही. लोकांना विचारात घेऊनच कायदे केले जातात. कायदे करताना संविधानातील तरतुदीला विसंगत होणार नाही, रुढी परंपरांना ठेच लागणार नाही, याची विशेष दक्षता प्रशासकीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचे सहसचिव विलास आठवले यांनी केले.
कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने ‘राज्य आणि देश पातळीवरील बदलते प्रशासकीय कामकाज आणि पत्रकारिता’ या विषयावरील वार्तालाप प्रसंगी ते बोलत होते. दसरा चौकातील प्रेस क्लबच्या कार्यालयात शुक्रवारी वार्तालाप झाला.
आठवले म्हणाले, विधान मंडळात न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ कार्यशील असते. प्रथम आम्ही भारतीय लोक असा विचार करून लोकांसाठी कायदा केला जातो. यामध्ये रोजगार हमी कायदा, माहितीचा अधिकार यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, उपाध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे, सचिव मनजित भोसले, कोषाध्यक्ष सचिन भोसले, संचालक सदाशिव जाधव, गुरुबाळ माळी, उदय कुलकर्णी, तानाजी पोवार, दयानंद लिपारे, राहुल जाधव, आदी उपस्थित होते.