...त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील; गुणरत्न सदावर्तेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 02:05 PM2023-06-15T14:05:02+5:302023-06-15T14:06:36+5:30

वकील गुणरत्न सदावर्ते नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात.

 Lawyer Gunaratna Sadavarte criticized Sharad Pawar saying that NCP Congress is a family party and it too will end | ...त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील; गुणरत्न सदावर्तेंची टीका

...त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील; गुणरत्न सदावर्तेंची टीका

googlenewsNext

कोल्हापूर: वकील गुणरत्न सदावर्ते नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. ते सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर आणि शरद पवार यांच्यावर टीका करतात. आता पुन्हा एकदा त्यांनी पवारांवर टीका केली असून राष्ट्रवादी हा कौटुंबिक पक्ष असल्याचे म्हटले आहे. "शरद पवार वैचारिक व्हायरस असून त्याला निर्जंतुक करणे यासाठी एस टी को ऑप बँक निवडणुकीत उतरलो आहे. शरद पवार यांची सत्ता बाजूला करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. पवार यांनी चालक-वाहक यांना कधी उमेदवारी दिली नाही", असे सदावर्तेंनी नमूद केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

दरम्यान, आम्ही कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी एस टी जनसंघ संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीत उतरलो आहोत. ३३ हजार मराठा आज आमच्यासोबत आहे. आम्ही सर्वाधिक उमेदवार दिले आहेत. कोल्हापूरमध्ये जे आम्ही पाहिलं, काही हिंदू तरुण लांबून पाहत होते त्यांची गुन्ह्यात नावं आली आहेत. याबाबत मी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. हसन मुश्रीफ यांचे देखील आम्ही काही चालू देणार नाही. पहिल्यांदा ही भूमिका आम्ही घेतली आहे. लव्ह जिहादच्या संदर्भाने मुंबईत आम्ही सगळ्यात मोठा मोर्चा काढला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
 
"लादलेले विचार स्वीकारू शकत नाही"
"लव्ह जिहाद, लँड जिहाद नंतर व्हॉट्सअप जिहाद सुरू झालं आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणार असून पोलीस यंत्रणेला देखील याबाबत पत्रव्यवहार करणार आहे. सर्वच ग्रुप चुकीचे वागत नाहीत. लादलेले विचार आम्ही स्वीकारू शकत नाही. तसेच संजय राऊत यांच्यासारखी पत्रकारिता पाहिली नाही", असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवारांवर टीका 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना सदावर्तेंनी म्हटले, "राष्ट्रवादी काँग्रेस हा कौटुंबिक पक्ष असून दोन ते तीन जिल्ह्यापुरता राहिला आहे. म्हणून हा पक्ष देखील संपून जाईल. त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील." 

Web Title:  Lawyer Gunaratna Sadavarte criticized Sharad Pawar saying that NCP Congress is a family party and it too will end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.