पुराच्या पाण्याबरोबर आलेल्या पालापाचोळ्याचा ऊसपिकावर थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:41+5:302021-08-12T04:27:41+5:30
यावर्षी आज अखेर १३९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुलनेत मागील वर्षी ७६४ मिलिमीटर पाऊस झाला होता. २१ ते ...
यावर्षी आज अखेर १३९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुलनेत मागील वर्षी ७६४ मिलिमीटर पाऊस झाला होता. २१ ते २८ जुलै दरम्यान झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने करवीर तालुक्यातील कुंभी, भोगावती, तुळसी, पंचगंगा या चार नद्यांच्या पूररेषेत असणाऱ्या हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊसपीक महापुराच्या पाण्याने कुजले आहे. माळरानावरील ऊस मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला आहे.
महापुराचे पाणी ओसरल्यानंतर या पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा, पालापाचोळा, कातवेर अनेक ठिकाणी पूरक्षेत्रातील उसाच्या क्षेत्रात अडकला आहे.उसात अडकलेल्या पालापाचोळा बाजूला केला नाही तर ते पीक कुजणार आहे. आणि तो बाजूला करताना पाण्यात असलेल्या उसाच्या पेरांना कवळुकी आल्याने सहज ऊस मोडत आहे.
१० बहिरेश्वर
बहिरेश्वर येथे उसाच्या शेतात वाहून आलेला पालापाचोळा शेतकरी बाजूला करत आहेत.