एलबीटी, जकात रद्द केल्यास आंदोलन

By admin | Published: November 19, 2014 10:33 PM2014-11-19T22:33:08+5:302014-11-19T23:21:07+5:30

कामगार संघटनेचा इशारा : डिसेंबरमध्ये काम बंद

LBT, protest after the cancellation of octroi | एलबीटी, जकात रद्द केल्यास आंदोलन

एलबीटी, जकात रद्द केल्यास आंदोलन

Next

सांगली : राज्य सरकारने जर एलबीटी आणि जकात रद्द केली, तर महाराष्ट्रातील सर्व २६ महापालिकांतील कामगार संघटनांच्या कृती समितीच्यावतीने डिसेंबरच्या ११ ते १३ दरम्यान सर्व मनपामध्ये ७२ तासांचे काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिका कामगार सभेचे दिलीप शिंदे यांनी दिला.
राज्य महापालिका, नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनची राज्यव्यापी परिषद पुणे येथे झाली. या परिषदेला सांगलीतून कामगार सभेचे दिलीप शिंदे, विजय तांबडे, पुंडलिक कांबळे, एकनाथ माळी, अशोक कांबळे यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
या परिषदेत २६ महापालिकांची कृती समिती स्थापन करण्यात आली. त्याच्या अध्यक्षतेपदी शरद राव यांची निवड करण्यात आली. यात एलबीटी आणि जकातीबाबत चर्चा झाली. पालिकांचे उत्पन्नाचे प्रमुख मार्ग बंद झाले तर नागरिकांचे हाल होतील. एलबीटी लागू केल्यापासून सर्व महापालिकांच्या उत्पन्नात ४० ते ७० टक्क्यापर्यंत तूट निर्माण झाली. अशा परिस्थितीत सरकारने व्यापाऱ्यांच्या दबाबाला बळी पडून एलबीटी व जकात रद्द केली, तर कामगार संघटनांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: LBT, protest after the cancellation of octroi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.