एलसीबी, माणुसकीकडून २५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:06+5:302021-06-06T04:19:06+5:30

लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झालेल्या गोरगरीब गरजूंना माणुसकी फाउंडेशन आणि पोलीस दल यांच्यावतीने महिन्याभरापासून संयुक्तपणे दोन वेळचे जेवण, तसेच ...

LCB distributes necessities to 250 families | एलसीबी, माणुसकीकडून २५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप

एलसीबी, माणुसकीकडून २५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप

Next

लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झालेल्या गोरगरीब गरजूंना माणुसकी फाउंडेशन आणि पोलीस दल यांच्यावतीने महिन्याभरापासून संयुक्तपणे दोन वेळचे जेवण, तसेच आवश्यक ती मदत दिली जात आहे. उद्योग, व्यवसाय बंद आहेत. हातावरचे पोट असलेल्यांचा रोजगारच बंद झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा गरजूंना जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विविध भागांतील गरजू कुटुंबांची माहिती गोळा करून २५० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे किट देण्यात आले. त्याचबरोबर पाळीव जनावरांसाठी चार्‍याच्या पेंढ्याही देण्यात आल्या. याप्रसंगी सपोनी जाधव, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवि जावळे, लहू कांबळे, विशाल कांबळे, केदार रनवरे, ऋषी देशमुख, सार्थक नेजे, इम्रान शेख, ओंकार सुतार, दीपक पाटील, प्रथमेश इंदुलकर उपस्थित होते. या चांगल्या कामात पोलीस बॉईज, हिमसितारा तरुण मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, मित्रप्रेम तरुण मंडळ व बॉईज कट्टा यांचे सहकार्य लाभले.

Web Title: LCB distributes necessities to 250 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.