सामाजिक विकासाची दृष्टी असणारा नेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:46+5:302021-04-21T04:23:46+5:30
निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मदतीला सातत्याने धावून जाणारा देवदूत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ...
निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मदतीला सातत्याने धावून जाणारा देवदूत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील तसेच सीमाभागातील अनेक कुटुंंबांचे जीवन त्यांनी प्रकाशमय केले आहे. काम घेऊन आलेल्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचे व त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याला सर्वतोपरी मदत करायची, या कामाच्या पद्धतीमुळे त्यांचा जनता दरबार सकाळी सहालाच भरलेला असतो. शासनाच्या विविध योजना तळागाळातील गरजूपर्यंत पोहोचण्यात महाराष्ट्रात कागल तालुका आघाडीवर आहे. याचे संपूर्ण श्रेय मंत्री हसन मुश्रीफ यांचे आहे. मिळालेली सत्ता ही सर्वसामान्य जनतेचे अश्रू पुसण्यासाठी आहे. मला मते दिलेल्या आणि न दिलेल्या जनतेचा मी आमदार व मंत्री आहे. त्यांचे दु:ख हलके करणे, त्यांच्या समस्या सोडविणे हे माझे कर्तव्य आहे, असे ते नेहमी म्हणतात. सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम ते अविरत करत आहेत. कार्यकर्त्यांला ताकद देऊन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका कायम असते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कागल तालुका संघाचे अध्यक्षपद देऊन विश्वास व्यक्त केला व मला काम करण्याची संधी दिली. असे हे सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेतृत्व असेच बहरत राहो, हीच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा...!!
फोटो :- सूर्याजी घोरपडे , अध्यक्ष, कागल तालुका संघ