नेत्यांनी डावलले, जनतेने स्वीकारले

By admin | Published: November 3, 2015 12:15 AM2015-11-03T00:15:03+5:302015-11-03T00:34:01+5:30

अपक्ष निलोफर आजरेकर विजयी : सर्व पक्षांच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल

The leaders accepted the davale, the people | नेत्यांनी डावलले, जनतेने स्वीकारले

नेत्यांनी डावलले, जनतेने स्वीकारले

Next

कोल्हापूर : उमेदवारी देताना प्रतिष्ठा करून नेत्यांनी डावलले; पण जनतेने स्वीकारले म्हणण्याची वेळ कॉमर्स कॉलेज, प्रभाग क्र. २६च्या निकालावरून दिसते. येथे सर्व पक्षांच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल लागला. सर्व नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे ताकद लावूनही या प्रभागातून मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्या स्नुषा निलोफर अशकीन आजरेकर यांनीे विजयाचा झेंडा उभारला. हिंदू -मुस्लिम सलोखा कार्यक्रमाचा त्यांना फायदा झाला.
कॉमर्स कॉलेज प्रभागात प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी एकापेक्षा एक सरस उमेदवार उभे केले होते. यामध्ये निलोफर आजरेकर यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असतानाही माजी आमदार पी. एन. पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावून आजरेकर यांना उमेदवारी देण्यास प्रखर विरोध केला होता. पाटील यांनी गायत्री अमर माने यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यास भाग पाडले; पण माने यांना अवघा १४६ मतांचा आकडा गाठता आला; त्यामुळे नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
काँग्रेसची उमेदवारी डावलल्याने आजरेकर निलोफर यांच्यासमोर ताराराणी-भाजपचा पर्याय होता; पण भागातील जनतेशी चर्चा केल्यानंतर महायुतीची उमेदवारी आजरेकर यांनी नाकारली. तोपर्यंत राष्ट्रवादीची उमेदवारी भाग्यरेखा पाटील यांना जाहीर झाली होती; तर शिवसेनेचीही उमेदवारी पूजा भोर यांना दिली होती. त्यामुळे मतदारांच्या मतानुसार आजरेकर यांंना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याचा निर्णय सासरे गणी आजरेकर यांनी घेतला. विशेष म्हणजे, ज्या उमेदवारीसाठी पी. एन. पाटील यांनी प्रतिष्ठा केली, त्या गायत्री माने यांना फक्त १४५ मतांवर समाधान मानावे लागले; तर मतमोजणीत आजरेकर यांची चुरस ‘ताराराणी’च्या गुलजारबी बागवान यांच्याशी झाली. पहिल्या दोन फेऱ्यांत बागवान यांनी आघाडी घेतली; तर आजरेकर या १४८ मतांनी पिछाडीवर होत्या; पण तिसऱ्या फेरीत आजरेकर यांना ३१५ मते मिळाल्याने त्यांची पिछाडी १९ मतांवर आली; पण अखेरच्या चौथ्या फेरीतही आजरेकर यांना २५७ मते मिळाली; तर बागवान यांना अवघ्या १९६ मतांवर रोखण्यात यश मिळवले. ( प्रतिनिधी )

Web Title: The leaders accepted the davale, the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.