‘मल्टिस्टेट’संदर्भात नेत्यांचा निर्णय मान्य; संचालकांची भूमिका : डोंगळेंना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:12 AM2019-07-12T01:12:43+5:302019-07-12T01:13:35+5:30

तसे झाल्यास ‘देर आये, लेकिन दुरुस्त आहे’ असे होईल. मी सत्तारूढ होतो, तेव्हाच मी पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांना सांगितले की, तुम्ही हे करायला जाऊ नका. सतेज पाटील म्हणाले, आमचे दोघांंचे भांडण हे दूध उत्पादकांच्या हितासाठी, अधिकारासाठी आहे.

 Leaders decide on 'multitait'; Role of Directors: The skyscraps have been omitted | ‘मल्टिस्टेट’संदर्भात नेत्यांचा निर्णय मान्य; संचालकांची भूमिका : डोंगळेंना वगळले

‘मल्टिस्टेट’संदर्भात नेत्यांचा निर्णय मान्य; संचालकांची भूमिका : डोंगळेंना वगळले

Next
ठळक मुद्दे‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची बैठक

कोल्हापूर : गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट’ करण्यासंदर्भात नेते जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा राहील, अशी ग्वाही सर्व संचालक मंडळाने गुरुवारी येथे दिली. संचालक अरुणकुमार डोंगळे यांना बैठकीला निमंत्रणच न दिल्याने त्यांना वगळल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर शेजारी कर्नाटक राज्यातील तीन तालुक्यांतील व्यक्ती संस्था, व्यक्ती सभासद यांना ‘गोकुळ’चे सभासदत्व दिले जाणार नसल्याचेही नेते व अध्यक्ष, ज्येष्ठ संचालकांनी स्पष्ट केले.

ताराबाई पार्क येथील दूध संघाच्या कार्यालयात दुपारी चार वाजता संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चार वाजता ‘गोकुळ’चे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे आगमन झाले. त्यानंतर सव्वाचारच्या सुमारास नेते माजी आमदार पी. एन. पाटील यांचे आगमन झाले. अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या दालनात बैठकीला सुरुवात झाली. यावेळी संचालक अरुण नरके, धैर्यशील देसाई, पी. डी. धुंदरे, विश्वास जाधव, राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, उदयसिंह पाटील, अंबरीश घाटगे, दीपक पाटील, सत्यजित पाटील, आदी उपस्थित होते.

बैठकीत महाडिक व पी. एन. पाटील यांनी संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी मल्टिस्टेटसंदर्भात घेतलेल्या भूमिकेबद्दल उपस्थित संचालकांना विचारणा करून मते अजमावून घेतली. यावर ‘डोंगळेंची ती भूमिका वैयक्तिक आहे. त्यामुळे ‘मल्टिस्टेट’संदर्भात नेते जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा राहील,’ अशी ग्वाही उपस्थित सर्व संचालकांनी दिल्याचे समजते. तसेच बैठकीला उपस्थित नसलेले संचालक विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, अनिल यादव यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांचीही भूमिका विचारली. त्यावर त्यांनीही आम्ही नेत्यांच्या निर्णयासोबत असल्याचे सांगितल्याचे समजते.

तसेच गोकुळ मल्टिस्टेट करून तो ताब्यात घेण्याच्या चर्चा निराधार असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले. कारण कर्नाटकातील तीन तालुक्यांमधील प्रत्येकी पाच दूध संस्थांनाच सभासदत्व दिले जाणार आहे. कोणतीही व्यक्तिगत संस्था किंवा व्यक्ती सभासद केला जाणार नाही, असेही नेत्यांनी व ज्येष्ठ संचालकांनी यावेळी स्पष्ट केले.

...अन्यथा मल्टिस्टेटविरोधातील
लढा तीव्र करू : मुश्रीफ, सतेज पाटील

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने का असेना, जर ‘गोकुळ’ मल्टिस्टेटचा मुद्दा संचालक मंडळ मागे घेणार असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र ते त्यांचीच भूमिका पुढे रेटणार असतील तर मात्र आम्ही त्याविरोधातील लढा तीव्र करू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी दिला. शासकीय विश्रामधाम येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुश्रीफ म्हणाले, आज आम्ही वृत्तपत्रांतून वाचले की मल्टिस्टेटबाबत संचालक मंडळ दोन पावले मागे घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ‘देर आये, लेकिन दुरुस्त आहे’ असे होईल. मी सत्तारूढ होतो, तेव्हाच मी पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांना सांगितले की, तुम्ही हे करायला जाऊ नका. सतेज पाटील म्हणाले, आमचे दोघांंचे भांडण हे दूध उत्पादकांच्या हितासाठी, अधिकारासाठी आहे. जर त्यांनी हा प्रस्ताव मागे घेतला तर लढाईत मिळालेला तो मोठा विजय असेल. जर त्यांनी प्रस्ताव पुढे रेटलाच तर मग आंदोलन सुरूच आहे; ते आणखी तीव्र करू.

डोंगळेंना डावलले
‘मल्टिस्टेट’संदर्भात थेट भूमिका घेणारे अरुणकुमार डोंगळे यांना बैठकीला निमंत्रणच न दिल्याने त्यांना डावलल्याचे स्पष्ट झाले. त्यांना वगळूनच ही बैठक घ्यायचीच हे ठरल्याची चर्चा सुरू होती.

मला निमंत्रणच नाही
‘संचालक मंडळाच्या बैठकीला आपल्याला निमंत्रणच दिलेले नव्हते; त्यामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहिलो नाही,’ असे संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title:  Leaders decide on 'multitait'; Role of Directors: The skyscraps have been omitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.