चंद्रकांत पाटलांनी आई- वडिलांवर केलेल्या वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरातांचा टोला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 03:38 PM2022-10-10T15:38:39+5:302022-10-10T15:39:11+5:30

देश कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.

Leaders should be loved; But parents should be respected says Balasaheb Thorat | चंद्रकांत पाटलांनी आई- वडिलांवर केलेल्या वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरातांचा टोला, म्हणाले...

चंद्रकांत पाटलांनी आई- वडिलांवर केलेल्या वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरातांचा टोला, म्हणाले...

Next

कोल्हापूर : एकवेळ आई- वडिलांना शिव्या दिलेल्या सहन करीन; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांना नाही, हे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य योग्य वाटत नाही. नेत्यांवर प्रेम असावे; पण आई- वडिलांचा आदर राखला पाहिजे, असा टोला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

बाळासाहेब थाेरात म्हणाले, शिवसेनेतील वादावर निवडणूक आयोगाने दिलेला निकाला धक्कादायक आहे. देशातील प्रत्येक नागरिकांने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. देश कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. भाजपने सुरू केलेले राजकारण देशाला घातक असून त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष कायम राहणार आहे. ते शिवसेना पुन्हा नेटाने उभी करण्यास समर्थ आहेत. महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे.

‘हे’ आरएसएसने सिद्ध करावे

राजकारणात वाद- विवाद होत असतात, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसबाबत जे काही विधान केले. ते भाजपला मान्य नसेल तर देशाच्या स्वातंत्र्यांमध्ये ‘आरएसएस’ होते हे त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान थोरात यांनी दिले.

Web Title: Leaders should be loved; But parents should be respected says Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.