सर्वसामान्‍यांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी झटणारे नेतृत्व : राजे स‍म‍रजितसिंह घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:56+5:302021-01-19T04:25:56+5:30

स्‍व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्‍या पश्‍चात समरजितराजेंनी शाहू ग्रुपची जबाबदारी धाडसाने, निर्भयपणे उचलली आणि सक्षमपणे पेललीही. आज ‘शाहू ग्रुप’ ...

Leadership for the Right to Justice of All: Raje Samirjit Singh Ghatge | सर्वसामान्‍यांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी झटणारे नेतृत्व : राजे स‍म‍रजितसिंह घाटगे

सर्वसामान्‍यांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी झटणारे नेतृत्व : राजे स‍म‍रजितसिंह घाटगे

Next

स्‍व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्‍या पश्‍चात समरजितराजेंनी शाहू ग्रुपची जबाबदारी धाडसाने, निर्भयपणे उचलली आणि सक्षमपणे पेललीही. आज ‘शाहू ग्रुप’ आणि त्‍याअंतर्गत संस्‍थांची वाटचाल प्रगतीकडेच आहे. यामध्‍येच त्‍यांच्‍या व्‍यवस्‍थापकीय व प्रशासकीय कौशल्‍याची प्र‍चिती येते. लोकांची कामे व्‍हावयाची तर एखादी मोठी राजकीय सत्‍ता हवी म्‍हणून त्‍यांनी राजकारणात येण्‍याचा निर्णय घेतला. २०१६ साली त्‍यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्‍यानंतर मात्र, त्‍यांनी मागे वळून पाहिले नाही. राज्‍यात त्‍यावेळी भाजपाची सत्‍ता होती. या संधीचा पुरेपूर फायदा उठवित जल‍युक्‍त शिवार, आरोग्‍य शिबिरे, वैदयकीय सेवा, रस्‍ते बांधकाम किंवा मुख्‍यमंञी सहायत्‍ता निधीतून मदत असो यामध्‍ये अगणित कामे केली. यामुळे अल्‍पावधीत ते जिल्‍हयाच्‍या राजकीय पटलावर नावारूपाला आले. सन २०१९ मध्ये विधानसभेच्‍या निवडणुका होत्‍या. कागल विधानसभा मतदार संघातून भाजपचे संभाव्‍य आणि विजयी उमेदवार म्‍हणून राजे सम‍र‍जितसिंह यांचे नाव लोकचर्चेत असताना ते राजकीय शह-कटशहाचा बळी ठरले. भाजपचे तिकीट कापले गेले. त्‍यामुळे खचून न जाता लोकाग्रहास्‍तव विधानसभा निवडणूक अपक्ष म्‍हणून लढण्‍याचा निर्णय घेतला. सिनिअर, अनुभवी आणि बलाढय शक्‍ती विरोधात असतानाही लोकांनी त्‍यांच्‍या कार्याची जाणीव ठेवीत त्‍यांना पहिल्‍याच राजकीय एंन्‍ट्रीत ९० (नव्‍वद) हजार मते देऊन त्‍यांचा सन्‍मान केला.

सम‍रजित‍सिंहराजे विधानसभा हरले. पण डगमगले नाहीत किंवा गप्‍प बसले नाहीत. शाहू ग्रुपची मोठी जबाबदारी आपल्‍यावर आहे याचे भान त्‍यांना होते. निवडणुकीतील अपयश बाजूला ठेवले. ९० हजार मतांची शिदोरी घेऊन शाहू ग्रुपच्‍या माध्‍यमातून पुन्‍हा समाजकारणात सक्रिय झाले. परिणामी भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाने त्यांच्या कार्याची नोंद घेऊन जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्‍यांच्‍या गळयात घातली. ही जबाबदारी आज ते ताकदीने पेलत आहेत. मिळालेल्‍या पदाचा वापर हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी करायचा या भावनेतून आज त्‍यांची वाटचाल सुरू आहे.

मागील काही महिन्‍यांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते आक्रमक झाले असलेतरी सकारात्मक दृष्टीने हे प्रश्‍न सुटावेत याच्‍याकडे त्‍यांचा कल आहे. मागील महिन्‍यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्‍यासाठी ते बांधावर गेले. शासनाने जाहीर केलेली तोकडी मदत वाढवून देण्यासाठी आवाज उठवला. एवढयावरच न थांबता शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्जमाफी योजनेत वंचित राहिलेल्‍या प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयाचे अनुदान द्यावे यासाठी आंदोलन केले. त्याचेच फळ म्हणून शासनाने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. पण त्यांना ते अद्याप मिळालेले नाही. ते मिळवून देण्‍यासाठी शिवार संवाद योजनेच्या माध्यमातून आज ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत .त्‍यांच्‍या या शेतकऱ्यांविषयीच्‍या तळमळीची चर्चा जिल्‍हाभर सुरू आहे. विशेष म्‍हणजे चिकोत्रा खोऱ्याला वरदान ठरणाऱ्या चिकोत्रा प्रकल्प १०० टक्के भरण्‍यासाठी उपाययोजना राबविल्या. त्यामुळे सलग दोन वर्षे हे धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. राजेंच्‍या या शाश्‍वत कामाची चर्चा कापशी परिसरात आहे.

दूध हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक. वाढत्या महागाईमुळे दूध धंदा परवडत नाही. दूधाचे दर वाढवून मिळावेत, यासाठी ते आग्रही आहेत. जागतिक महामारी कोरोनामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे बळ वाढवण्यासाठी त्यांनी कोरोना सेंटरना भेटी दिल्या. या भेटीत त्‍यानी कोरोना योध्‍दे, शासकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्‍य सेवक, आशासेविका या सर्वांचा सत्कार केला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यामुळे त्यांना कोरोनाशी दोन हात करताना लढण्यासाठी बळ मिळाले. असा उपक्रम राबविणारे ते जिल्‍हयातील एकमेव नेते ठरले.

लॉकडाऊन काळातील वाढून आलेली वीज बिले माफ करावीत, शासनाने केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी यासाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवला. शिवार संवाद योजनेच्या माध्यमातून त्यांनी असे अनेक सामाजिक प्रश्न हाताळले आहेत,. की ज्‍यामुळे सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांच्‍यामध्‍ये राजे समरजितसिंह घाटगे यांच्‍याबद्दल आपल्या न्याय हक्कासाठी झगडणारा आपला नेता ही भावना वाढीस लागली आहे.

राजे आपणास निरोगी आयुष्‍य लाभो ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !!

आणासाहेब कुंभार

प्र‍सिध्‍दी प्रमुख शाहू साखर

Web Title: Leadership for the Right to Justice of All: Raje Samirjit Singh Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.