हातकणंगले तालुक्यात समझोत्याच्या आघाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:23+5:302020-12-26T04:19:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : हातकणंगले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पॅनेल बांधणीच्या हालचालींना फॉर्म दाखल करण्याचा प्रक्रियेपासून वेग आला ...

Leading settlement in Hatkanangle taluka | हातकणंगले तालुक्यात समझोत्याच्या आघाड्या

हातकणंगले तालुक्यात समझोत्याच्या आघाड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : हातकणंगले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पॅनेल बांधणीच्या हालचालींना फॉर्म दाखल करण्याचा प्रक्रियेपासून वेग आला आहे. पक्ष, गट, तट यापेक्षा सोयीच्या राजकारणाला महत्त्व आले असल्याचे दिसून येत आहे. अनपेक्षित साटेलोटे होत असून गतवेळचे विरोधक एकत्र येण्याचा सपाटाच अनेक गावांत लावल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. इचलकरंजी, हातकणंगले असे दोन विधानसभा मतदारसंघ तालुक्यात आहेत. त्यापैकी हातकणंगले विधानसभा मतदारसंघात १९, तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात २ गावांची निवडणूक लागली आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार राजू आवळे यांच्या दृष्टीने या निवडणुकीतील निकाल महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सकारात्मक भूमिका घेत ज्या गावच्या निवडणुका बिनविरोध होतील त्यांना २५ लाखांचा आमदार निधी विकासकामांसाठी देण्याची घोषणा केली आहे. सध्या तरी खोची, बिरदेववाडी या दोन ठिकाणी बिनविरोध होण्याची शक्यता आहे, पण उमेदवार निवडीवरून खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत समझोत्याची भूमिका टिकली तरच त्यास यश येणार आहे. पाडळी, मनपाडळे, वाठार तर्फ वडगाव, किणी, तासगाव, मिणचे, लाटवडे, खोची, बुवाचे वाठार, नेज, कुंभोज, दुर्गेवाडी, बिरदेववाडी या तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांत काँग्रेस,जनसुराज्य, शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये परंपरेप्रमाणे विरोधाची मोर्चेबांधणी सुरू आहे, तर हालोंडी, माणगाव, माणगाववाडी, जंगमवाडी, रुई, तिळवणी येथे आवाडे गट, काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना हे प्रतिस्पर्धी म्हणून लढण्याच्या तयारीत आहे. कबनूर, चंदूर ही दोन्ही गावे मोठी असल्याने येथे पॅनेलची तसेच उमेदवारांची गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

काही गावांत महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी दिलेल्या सूचक इशाऱ्यानुसार महाविकास आघाडी एकत्र येत आहेत. लोकप्रतिनिधींनीसुद्धा ती भूमिका घेत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, परंतु गावपातळीवरील राजकारण या सूचनाच्या पालनास दाद देत नसल्याचे दिसते. या निवडणुकीत मात्र उमेदवार निवड जास्त क्लिष्ट बनली आहे. तरुणांचा उमेदवारीसाठी आग्रह होत आहे. विजयी होण्याची हमी मिळावी यासाठी सोयीच्या आघाड्या निर्माण होताना दिसत आहेत.

Web Title: Leading settlement in Hatkanangle taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.