शिरोळमध्ये आघाड्या, उमेदवार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:19 AM2020-12-23T04:19:59+5:302020-12-23T04:19:59+5:30

संदीप बावचे शिरोळ : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ गावापुरत्या मर्यादित राहिल्या ...

Leads at the top, candidate fixed | शिरोळमध्ये आघाड्या, उमेदवार निश्चित

शिरोळमध्ये आघाड्या, उमेदवार निश्चित

Next

संदीप बावचे

शिरोळ : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ गावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी, यासाठी गावपुढाऱ्यांना केंद्रित करण्यात आले आहे. तालुक्यात सोयीनुसार आघाड्या निश्चित झाल्या असून, उमेदवारही फायनल झाले आहेत.

शिरोळ तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे रणांगण सुरू झाले आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, स्वाभिमानी व शिवसेनेला काही जागा मिळाल्या होत्या. पक्षापेक्षा नेत्यांनी सोयीच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक आघाड्या केल्यामुळे निवडणुकीचा निकाल राजकीय ताकद दाखविणारा ठरला होता.

दरम्यान, राज्यातील सत्ताबदलामुळे तालुक्यांतील राजकारणातही बदल झाला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ‘स्वभिमानी’ने उदगावसह दानोळी व नांदणी ग्रामपंचायतींची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेससह शिवसेना, भाजप व यड्रावकर गटांनी सावध भूमिका घेत सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, ‘गुरुदत्त शुगर्स’चे माधवराव घाटगे, अनिल यादव यांची व्यूहरचना यशस्वी ठरली असली तरी ग्रामपंचायतींवर बहुमत मिळविण्यासाठी गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चौकट

सरपंच निवडीसाठी आघाडीचा पॅटर्न

शिरोळ तालुक्यात गावपातळीवरील राजकारणाला ग्रामपंचायत निवडणुकीत अधिक महत्त्व असल्याने या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. मात्र, सरपंच निवडीसाठी महाविकास आघाडीचा पॅटर्न ग्रामपंचायतीमध्ये वापरला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

चौकट -

लक्षवेधी लढती

अर्जुनवाडसह नांदणी, उदगाव, कोथळी, दानोळी, चिपरी, दत्तवाड, यड्राव, शिरदवाड, शिरढोण, धरणगुत्ती या गावांतील लढती लक्षवेधी होणार आहेत.

Web Title: Leads at the top, candidate fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.