पत्रके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:47+5:302020-12-29T04:22:47+5:30
कोल्हापूर : डी. डी. शिंदे सरकार स्पोर्टस्तर्फे घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. शहर मर्यादित झालेल्या ...
कोल्हापूर : डी. डी. शिंदे सरकार स्पोर्टस्तर्फे घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
शहर मर्यादित झालेल्या या बेल्ट परीक्षेत यश मिळविलेल्या खेळांडूचा सिम्बाॅलिक इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका गीता पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो पंच ऐश्वर्या राऊत, राष्ट्रीय पंच रोहित बांबूळकर, केदार दळवी, ओंकार लंबे, प्रजित चौगुले, सोनाली बांबुळकर, अनंत रोकडे, व्यंकटेश गवळी, अथर्व गायकवाड, ऋतुपर्ण स्वामी, पीयूषा गुजर, ऋतुजा उरुणकर, ऋषिका तोरस्कर, अनुष्का निकम यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी संस्था अध्यक्ष कृष्णात जंगम, पदाधिकारी अशिष कदम, साताप्पा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
क्रांतिवीर रंगरावदादा पाटील जयंती साजरी
कोल्हापूर : येथील ताराराणी विद्यापीठाच्या कमला काॅलेजमध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांची १०२ वी जयंती शुक्रवारी (दि.२५) साजरी करण्यात आली. यानिमित्त संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डाॅ. क्रांतिकुमार पाटील यांनी रंगरावदादांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्राचार्या डाॅ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य प्रा. पी. एस. जाधव, ग्रंथपाल उर्मिला कदम, प्रा. अनिल घस्ते, प्रा. डाॅ. सुजय पाटील, प्रा. ए. एम. साळोखे, एस. बी. शिंदे, प्रताप ऐनापुरे, आदी उपस्थित होते.
(फोटो : २७१२२०२०-कोल-कमला काॅलेज)
आेळी : कमला काॅलेजमध्ये क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांची १०२ वी जयंती शुक्रवारी (दि.२५) साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणतज्ज्ञ बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांना अभिवादन
कोल्हापूर : शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक थोर शिक्षणतज्ज्ञ बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि. २६) गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयातील त्यांच्या पुतळ्यास प्राचार्य डाॅ. पी. के. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्था सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन सदस्य दौलत देसाई, प्रशासन अधिकारी प्रा. डाॅ. मंजिरी मोरे, उपप्राचार्य प्रा. एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक प्रा. एस. एन. मोरे, आदी उपस्थित होते.
बास्केटबाॅल स्पर्धेत नाईट काॅलेज प्रथम
कोल्हापूर : देशभक्त डाॅ. रत्नाप्पाआण्णा कुंभार यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या बास्केटबाॅल स्पर्धेत नाईट काॅलेज संघाने डी. आर. के. स्पोर्टस्चा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत नाईट काॅलेज संघाने ६८ गुणांची कमाई करीत डी. आर. के. संघावर पाच गुणांनी मात केली. अंतिम सामन्यात डी. आर. के. संघाला ६३ गुण मिळाले. द्वितीय क्रमांक डी. आर. के. सेंटरने, तर तृतीय क्रमांक चॅलेंजर स्पोर्टस्ने पटकाविला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ शहाजी लाॅ काॅलेजचे प्राचार्य डाॅ. आर. नारायण, नाईट काॅलेजचे प्राचार्य डाॅ. सुरेश फराकटे, आंतरराष्ट्रीय पंच डाॅ. शरद बनसोडे यांच्या उपस्थित पार पडला. स्पर्धेसाठी पंच म्हणून अमित दलाल, आकाश जाधव, उदय पाटील, रोहन नायकवडे, अमिर मुल्लाणी, प्रशांत साळोखे, संदीप खोत, अनिरुद्ध विटेकर यांनी काम पाहिले.