गांधीनगर प्रादेशिक नळपाणी योजनेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:34+5:302021-05-13T04:23:34+5:30

उचगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक गांधीनगर नळपाणी पुरवठा योजनेला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडीजवळ मोठी गळती लागली आहे. ही ...

Leakage to Gandhinagar Regional Tap Water Scheme | गांधीनगर प्रादेशिक नळपाणी योजनेला गळती

गांधीनगर प्रादेशिक नळपाणी योजनेला गळती

Next

उचगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक गांधीनगर नळपाणी पुरवठा योजनेला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडीजवळ मोठी गळती लागली आहे. ही असून गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या १३ गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. कणेरीवाडीजवळच्या रस्त्यालगत असलेल्या नळपाणी योजनेच्या ६०० मी. मी. व्यासाच्या मुख्य नलिकेतून मोठ्या प्रमाणावर गळती लागून पाणी वाया जात आहे. त्यामुळे गांधीनगर, गडमुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी,उजळाईवाडी, गांधीनगर, गोकुळ शिरगांव, पाचगाव, मोरेवाडी, आर. के. नगर, कणेरी, मणेरमळा, शांतीनगर या गावांना पाणीपुरवठा होणार नाही. या योजनेचे गळती काढण्याचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. त्यामुळे संबंधित गावांमधील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. डी. चौगुले व शाखा अभियंता एन. बी. लोकरे यांनी केले आहे. चौकट :

सुधार योजना कधी

गांधीनगर प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीची मुदत संपल्याने ती जीर्ण झाली असून या जलवाहिनीला अनेक ठिकाणे लहान-मोठ्या गळती लागलेल्या आहेत. त्यामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो. परिणामी संबंधित गावांतील नागरिक हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे सुधार पाणीपुरवठा योजनेचे काम कधी सुरू होणार याकडे या गावातील गावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

फोटो : १२ उचगाव पाणीपुरवठा

कणेरीवाडी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागली असून गळती काढताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी. (छाया : मोहन सातपुते)

Web Title: Leakage to Gandhinagar Regional Tap Water Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.