कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:07+5:302021-07-12T04:17:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती लागली आहे. शिरढोण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती लागली आहे. शिरढोण (ता. शिरोळ) गावानजीक नदीपात्रात असलेल्या जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात केंदाळ साचल्याने गळती काढण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. आज, सोमवारपासून गळती काढण्यात येणार असून, यामुळे शहरातील पाणी पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी दिली.
कृष्णा योजनेतून शहराला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. या योजनेला वारंवार गळती लागत असल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. शिरढोणनजीक रविवारी पुन्हा जलवाहिनीला मोठी गळती लागल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच सभापती सुर्वे, जल अभियंता सुभाष देशपांडे, अभियंता बाजी कांबळे, आदींनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गळती असलेल्या ठिकाणी जलवाहिनीवरच मोठ्या प्रमाणात केंदाळ साचल्याने गळती काढण्यात अडचण येत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडील कर्मचारी व व्हाईट आर्मीच्या जवानांकडून हे केंदाळ काढण्याचे काम सुरु आहे. सोमवारपासून गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकरीने वापर करावा, असे आवाहन सुर्वे यांनी केले आहे.