Kolhapur: थेट पाइपलाइनची चाचणी करताना गळती, अर्जुनवाडा फाट्याजवळ व्हॉल्व्ह तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 12:20 PM2023-08-10T12:20:57+5:302023-08-10T12:21:11+5:30

मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले, शेतीचे नुकसान झाले

Leakage while testing the Kalammawadi direct pipeline, a valve broke near the Arjunwada branch | Kolhapur: थेट पाइपलाइनची चाचणी करताना गळती, अर्जुनवाडा फाट्याजवळ व्हॉल्व्ह तुटला

Kolhapur: थेट पाइपलाइनची चाचणी करताना गळती, अर्जुनवाडा फाट्याजवळ व्हॉल्व्ह तुटला

googlenewsNext

तुरंबे : कोल्हापूर शहरासाठीच्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे काम महिन्यात पूर्ण करण्यासाठी टेस्टिंग सुरू आहे. बुधवारी अर्जुनवाडा फाट्याजवळ एअर व्हॉल्व्हला भगदाड पडल्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा पडून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. तसेच शेतीचे नुकसान झाले. हे पाहण्यासाठी कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

दिवाळीच्या आधीच काळम्मावाडी धरणाचे पाणी उपलब्ध होईल. धरणस्थळावरील जॅकवेलची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. बुधवारी पन्नास हॉर्स पॉवरच्या पंपाद्वारे जलवाहिनीत पाणी सोडून टेस्टिंगचे काम सुरू होते. अर्जुनवाडा फाट्याजवळ २८ किलोमीटरमध्ये काळम्मावाडीपासून जलवाहिनीत पाणी आले. 

सायंकाळी चारच्या सुमारास पाइपच्या एअर व्हॉल्व्हचे लॉक तुटल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह पाइपमधून बाहेर पडत होता सुमारे ५० मीटर परिसरात पाण्याचे फवारे उडाले होते; तसेच त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला होता. घटनास्थळी पाइपला एअर व्हॉल्व्हसाठी पाइप कट करून ठेवली होती; परंतु त्याला वेल्ड मारली नव्हती. त्याच्यावर ठेवण्यात आलेला पत्रा व पत्र्यावर टाकलेला मुरूम पाण्याच्या दबावामुळे परिसरात विस्कटलेला होता. पाण्यामुळे सचिन केरबा पाटील या शेतकऱ्याच्या ऊस पिकाचे नुकसान झाले.

जल अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, ‘काळम्मावाडीच्या थेट पाइपलाइनचे टेस्टिंग सुरू आहे. इयर व्हॉल्व्ह कट झाल्यामुळे किलोमीटर २८ ते ३० च्या दरम्यान गळती झाली आहे. गळतीचा व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांची टीम पाठवून दिली आहे.’

Web Title: Leakage while testing the Kalammawadi direct pipeline, a valve broke near the Arjunwada branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.