भाडेपट्टा, कब्जेहक्कातील जमिनींवरील स्थिगिती उठवली: दीडशेवर प्रस्तावांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:48+5:302021-02-05T07:15:48+5:30

कोल्हापूर : भाटेपट्ट्याने अथवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनींचे वर्ग एक करण्यावरील स्थगिती राज्य शासनाने उठवली आहे. त्यामुळे या जमिनी ...

Lease, lifting of moratorium on occupied lands: One and a half hundred proposals will benefit | भाडेपट्टा, कब्जेहक्कातील जमिनींवरील स्थिगिती उठवली: दीडशेवर प्रस्तावांना होणार लाभ

भाडेपट्टा, कब्जेहक्कातील जमिनींवरील स्थिगिती उठवली: दीडशेवर प्रस्तावांना होणार लाभ

googlenewsNext

कोल्हापूर : भाटेपट्ट्याने अथवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनींचे वर्ग एक करण्यावरील स्थगिती राज्य शासनाने उठवली आहे. त्यामुळे या जमिनी वर्ग एक करण्याचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील दीडशेच्या वर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वीच्या शासनाने भाडेपट्ट्याने अथवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींचे भोगवाटदार वर्ग दोनमधून वर्ग एक करण्याचा निर्णय घेतला होता. याची अधिसूचना मार्च २०१९ मध्ये काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत दीडशेवर प्रस्ताव आले होते. काही नागरिकांना चलन पाठवून जमीन वर्ग एक करण्यासाठीची रक्कम भरा, असे पत्रही पाठवण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० डिसेंबरला या निर्णयाला स्थगिती दिली, या स्थगितीमुळे वर्षानुवर्षे जमीन वर्ग एक करण्यासाठी धडपडत असलेल्या नागरिकांना मोठा मन:स्ताप झाला. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे ही स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणीदेखील केली होती. मात्र निर्णय शासनस्तरावर झालेला असल्याने स्थानिक पातळीवर हा बदल करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे नागरिकांना आदेश उठेपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र राज्य शासनाने ही स्थगिती उठवली असून नागरिकांना आपली जमीन वर्ग एक करता येणार आहे.

---

Web Title: Lease, lifting of moratorium on occupied lands: One and a half hundred proposals will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.