शिवाजी विद्यापीठात उद्या रघुनाथ माशेलकर यांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:28 AM2021-08-22T04:28:39+5:302021-08-22T04:28:39+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापाठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने उद्या, सोमवारी ख्यातनाम शास्त्रज्ज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांचे व्याखान आयोजित केले आहे. ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापाठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने उद्या, सोमवारी ख्यातनाम शास्त्रज्ज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांचे व्याखान आयोजित केले आहे. हे व्याख्यान झूम या ऑनलाइन प्लॅटफाॅर्मवर दुपारी २.१५ वाजता होणार आहे. “इनोव्हेशन लीड आक्सिलिरेटेड इन्क्लुसिव्ह ग्रोथ” या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. डी.टी. शिर्के असणार आहेत. अशी माहिती विभागप्रमुख प्रा. ज्ञानदेव तळले यांनी दिली.
अर्थशास्त्र विभागाच्या वतीने देश-विदेशातील नामवंत अर्थतज्ज्ञ व शास्त्रज्ज्ञांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यात सोमवारी ज्येष्ठ वैज्ञानिक डाॅ. रघुनाथ माशेलकर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरू डाॅ. पी.एस. पाटील, विभागातील प्रा. डाॅ. यशवंत थोरात, प्रा. ज्ञानदेव तळुले, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सेमिनार व वर्कशाॅप या मथळ्याखाली ‘लेक्चर सेरीज इकाॅनाॅमिक्स येथे व्याख्यानाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्याख्यानात विद्यार्थी, संशोधक, शिक्षक व अन्य अभ्यासकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो : २१०८२०२१-कोल- रघुनाथ माशेलकर