एलईडी प्रकल्प महापालिकेने स्वत: राबवावा
By admin | Published: October 28, 2016 11:44 PM2016-10-28T23:44:05+5:302016-10-28T23:44:05+5:30
ताराराणी-भाजप आघाडीची मागणी : राज्याकडून पाच कोटी
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वीज खर्चात बचत करणारा एलईडी बल्ब बसविण्याचा प्रकल्प कोणत्याही ठेकेदारास न देता तो महानगरपालिका प्रशासनाने स्वत: राबवावा, अशी मागणी ताराराणी-भाजप आघाडीच्या वतीने सत्यजित कदम व विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. सुमारे बारा कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखविली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
संपूर्ण शहरात वीज आणि खर्चात बचत करणारा हा प्रकल्प तातडीने राबवावा, अशी मागणी गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही प्रशासनाकडे करीत आहोत, अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही केली आहे; परंतु पुढील कोणतीही प्रक्रिया प्रशासनाने केलेली नाही. जर हा प्रकल्प राबविला तर आज जो साडेआठ कोटी रुपये खर्च येतो, तो चार कोटींपर्यंत खाली येणार आहे. यामुळे महापालिकेचे साडेचार कोटी रुपये वाचणार असून, ते अन्य विकासकामांवर वापरता येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. प्रली असल्याने तो प्रकल्प मार्चपूर्वी पूर्ण करावा, अशी कदम यांनी मागणी केली.
चार ते साडेचार कोटींची बचत शासन दिरंगाई करीत असून, त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. अंदाजपत्रकात तरतूद के
सध्या संपूर्ण शहरात २४ हजार ६०० पथदिवे असून, त्यावर ७ कोटी २५ लाख रुपये वीज खर्च येतो. शिवाय प्रशासकीय इमारतीतील दिव्यांवर ७५ लाख रुपये वीज खर्च येतो. या खर्चात बचत करायची असेल तर एलईडी बल्ब बसविणे आवश्यक आहे. प्रकल्पास येणारा १२ कोटींचा खर्च केला की पुढील प्रत्येक वर्षात विजेच्या खर्चात पन्नास टक्क्यांनी कपात होणार आहे